AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kitchen Tips : कुकरचा रबर सैल झालाय? झाकणातून वाफ बाहेर येतेय ? हे घरगुती उपाय करून पाहा

प्रेशर कुकरच्या रबरमध्ये घाण साचल्यामुळे किंवा गॅस्केट खराब झाल्यामुळे झाकणातून वाफ बाहेर येऊ शकते. रबर स्वच्छ करण्यापासून योग्य वेळी बदलण्यापर्यंत या सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.

Kitchen Tips :   कुकरचा रबर सैल झालाय? झाकणातून वाफ बाहेर येतेय ? हे घरगुती उपाय करून पाहा
cooker rubberImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2026 | 6:46 PM
Share

प्रेशर कुकर हा रोजच्या स्वयंपाकातला महत्त्वाचा भाग आहे. पण सतत वापरामुळे त्याचा रबर म्हणजेत गॅस्केट सैल होऊ शकतो. रबर नीट फिट न झाल्यास कुकरचं झाकण बंद होण्यात अडचण होते. वाफ बाहेर जाते. त्यामुळे धड भात शिजतही नाही आणि गॅसही फुकट जातो. अशावेळी काही सोप्या घरगुती उपाय करुन पाहता येतात. मात्र रबर खूपचं जुना झाला असेल किंवा तुटला असेल तर ते बदलणं गरजेचं आहे.

रबर काढून स्वच्छ धुवा

कधी कधी रबर खराब झालेला नसतो,पण त्याच्यात अन्नाचे कण जाऊन अडकतात किंवा काही घाण साचल्यामुळे ती व्यवस्थित बसत नाही. अशावेळी रबर काढून तो स्वच्छ पाण्याने धुवा. तो रबर पुर्णपणे कोरडा झाल्यानंतरच कुकरला फिट बसवा. जोर काढून बसवण्याचा प्रयत्न करू नका.

रबर गरम असेल तर थंड होऊ द्या

कुकरचा सतत वापर केल्यामुळे रबर गरम होऊ शकतो आणि सैल सुद्धा वाटू शकतो. अशावेळी कुकर बंद करून रबर काही वेळ सामान्य तापमानाला येऊ द्या. त्यानंतर तो काढून स्वच्छ करून कोरडा करा. पुन्हा कुकरवर बसवा.

झाकण लावण्याआधी कडा तपासा

कुकर बंद करण्यापूर्वी झाकणाची कडा, रबर आणि कुकरचे हँन्डल स्वच्छ आहे का ते पाहा. भात,डाळ किंवा इतर पदार्थांचे छोटे कण अडकले असतील तर ते काढून टाका.

कुकरमध्ये जास्त डब्बे लावू नका

कुकर वापरताना त्यात मर्यादेपेक्षा जास्त पाणी किंवा अन्न भरू नका. मर्यादेपेक्षा जास्त भरल्यामुळे तो फुटण्याची शक्यता असते. तसेच झाकण, सीटी आणि व्हॉल्वचीही वेळोवेळी तपासणी करा.

रबर धुतल्यानंतर पूर्ण कोरडा करा

प्रत्येक वापरानंतर रबर स्वच्छ धुवून पुर्णपणे कोरडा करून ठेवा. जास्त उष्णतेमुळे रबर लवकर खराब होण्याची शक्यता असते.

रबर पाण्यात टाकण्याचा उपाय

रबर सैल झाला असेल तर रात्रभर रबर पाण्यात भिजत ठेवावा. सकाळीपर्यंत रबर चांगला कडक होतो.

रबर तुटलेला असेल तर जुगाड करू नका

रबरमध्ये भेगा पडल्या असतीस ती खूप कडक किंवा सैल झाला असेल. तर तो बदलणेच योग्य आहे.कुकरच्या मॉडेलनुसार योग्य आकाराचा नवा रबर वापरा. खराब रबरवर घरगुती जुगाड करणं सुरक्षित नाही यामुळे काही वेळेस कुकर फुटण्याची शक्यता असते.

Follow Us
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा