
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा देश – विदेशात सर्वत्र होत असते. मोदी यांच्या बोलण्याचा अंदाज, त्यांच्या कपड्यांची आवड… सर्वकाही फार वेगळं आणि उत्तम आहे… मोदी फक्त त्यांच्या भाषणामुळेच नाही तर, कपड्यांमुळे देखील चर्चेत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कपाटात विशेषतः खादी आणि पारंपरिक भारतीय कपड्यांचा समावेश असतो, पण त्यात काही डिझायनर कपड्यांचाही समावेश असतो. त्यामुळे, जेव्हा मोदी वेगळ्या सूटमध्ये जनतेशी संवाद साधतात, तेव्हा ते कुठून येतात असा प्रश्न लोकांना अनेकदा पडतो.
सांगायचं झालं तर, पंतप्रधान मोदी अनेकदा कुर्ता-पायजमामध्ये दिसतात, ज्यात अर्ध्या बाह्यांचा सुती किंवा खादीचा कुर्ता आणि घट्ट चुडीदार पायजमा यांचा समावेश असतो. तर मोदी यांचे कपडे कोण तयार करतं, याबद्दल जाणून घ्या, अहमदाबादस्थित ‘जेडब्लू’ नावाचं एक शॉप आहे. जिथे फक्त पुरुषांचे कपडे बनवले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून हे दुकान अहमदाबाद येथे आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बिपिन चौहान हे गुजरातस्थित फॅशन ब्रँड ‘जेडब्लू’चे व्यवस्थापकीय संचालक आणि सह-संस्थापक आहेत. बिपिन चौहान आणि जितेंद्र चौहान दोन भाऊ 1989 पासून मोदींचे कपडे शिवण्याचं आणि उत्तम निवडण्याचं काम करत आहेत. एवढंच नाही तर, असं देखील सांगितलं जातं की, मोदी स्वतः कापड निवडतात आणि शिलाईवर देखील लक्ष ठेवतात. व्यस्त वेळापत्रकामुळे मोदी यांना दुकानात जाता येत नाही. यामुळे मोदी दिल्ली किंवा गंधीनगर येथे बिपिन चौधरी यांना माप घेण्यासाठी बोलावतात.
रिपोर्टनुसार, जेव्हा मोदी आरएसएसचे प्रचारक होते, तेव्हा ते सुप्रीमो क्लोथिंग या छोट्या दुकानात जायचे… जे आता जेडब्ल्यू ब्रँडम्हणून उदयास आलं आहे… बिपिन चौहान यांना मोदी कुर्त्याचे जनक मानलं जातं आणि 2012 मध्ये मोदी यांनी त्यांना ‘मोदी कुर्ता’ आणि ‘मोदी जॅकेट’ यांचे ट्रेडमार्क वापरण्याची परवानगी दिली.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोदी यांच्या स्टाईलने प्रेरित होत जेडब्ल्यू ब्रँडने अनेक प्रॉडक्ट लॉन्च केले… आज हा ब्रँड कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत आहे. पण सूट आणि वेस्टर्न लूकसाठी मोदी ट्रॉय कोस्टा (Troy Costa) च्या कपड्यांना अधिक पसंती देतात… अशी माहिती देखील समोर आली आहे.