मुळ्याची पाने खाण्याचा कंटाळा करतायत?, थांबा जाणून घ्या ‘हे’ फायदे

| Updated on: Mar 24, 2021 | 8:44 AM

नेकांच्या लोकांना मुळा खायला आवडत नाही. मुळ्याच्या चवीमुळे आणि उग्र वासामुळे सारेच खाण्यासाठी कंटाळा करतात.

मुळ्याची पाने खाण्याचा कंटाळा करतायत?, थांबा जाणून घ्या हे फायदे
Follow us on

मुंबई : अनेक लोकांना मुळा खायला आवडत नाही. मुळ्याच्या चवीमुळे आणि उग्र वासामुळे अनेक लोक मुळा खाण्यासाठी कंटाळा करतात. मात्र, मुळा आणि मुळ्याच्या पानांमध्ये अत्यंत गुणकारी गुणधर्म आहेत. मुळ्याच्या पानांमध्ये फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स असतात. हे उकडून, भाजी बनवून किंवा इतर भाज्या म्हणजेच मटारसोबत मिक्स करुन खाता येऊ शकते. सलादमध्ये मुळ्याच्या पानांचा समावेश केल्यास आपल्या आरोग्याला त्याचे अनेक फायदे होतात. (Radish leaves are beneficial for health)

-मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही अनेक फायदा होतात.

-मुळा किंवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते. त्यामुळे त्वचा चांगली पाहिजे असेल तर आजच मुळ्याची पाने आपल्या आहारात समाविष्ट करा.

-मुळ्यामध्ये एंथोकायनिन असते. जे कॅन्सरचा प्रतिकार करण्यास मदत करते. त्यामुळे मुळा रोज आपल्या जेवणात असणं आवश्यक आहे. मुळ्याच्या भाजीसोबत मुळ्याची भजी आणि कोशिंबीर देखील खाऊ शकता.

-यामध्ये आर्यन, फॉस्फोरस असते. ज्यामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढते आणि कमजोरी दूर होते. अशक्तपणा कमी करण्यासाठी मुळ्याची भरपूर मदत होते.

-यामध्ये डाययूरेटिक गुण असतात. जे युरिनसंबंधीत प्रॉब्लम दूर करण्यात इफेक्टिव्ह आहे. भरपूर पाणी पिण्याबरोबरच मुळा देखील फायदेशीर आहे.

-मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Radish leaves are beneficial for health)