मुळाच नाहीतर मुळ्याची पाने देखील आरोग्यदायी; वाचा कामाची माहिती

आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच मुळा माहिती आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

मुळाच नाहीतर मुळ्याची पाने देखील आरोग्यदायी; वाचा कामाची माहिती
मुळा

मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच मुळा माहिती आहे. मुळा खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कारण मुळ्यात कर्बोदके, फॉस्फरस लोह आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. विशेष म्हणजे कच्चा मुळा खाल्ल्याने चांगली भूक लागून अन्न व्यवस्थित पचण्यास मदत होते. मात्र, मुळाच नव्हेतर मुळ्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. (Radish leaves are extremely beneficial for health)

मुळ्याच्या पानात फॉलिक अॅसिड सारखे अनेक न्यूट्रिएंट्स व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी तसेच क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पौष्टिकता भरपूर प्रमाणात असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

सध्या कोरोनाच्या काळामध्ये मुळ्याची पाने खाणे अत्यंत फायदेशीर आहे. कारण मुळ्याची पाने खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि आपल्या शरीरातील थकवा कमी होतो.

-मुळा किंवा त्याची पाने खाल्लाने बॉडीचे टॉक्सिस्न दूर होतात आणि त्वचा उजळते. त्यामुळे त्वचा चांगली पाहिजे असेल तर आजच मुळ्याची पाने आपल्या आहारात समाविष्ट करा.

-मुळ्याच्या पानांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. हे खाल्ल्याने डायझेशन अधिक चांगल्या पद्धतीने होते. मुळ्याच्या पानांचा रस प्यायल्यासही अनेक फायदा होतात.

-मुळ्याच्या पानांमध्ये असे बरेच गुणधर्म आहेत, जे साखरेची पातळी कमी करण्यास मदत करतात. यासाठी आपण मुळ्याच्या पानांची भाजी देखील करून खाऊ शकतो. ही भाजी चवदार देखील होते.

-मुळ्याच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, जे अँटीऑक्सिडेंट म्हणून कार्य करते. त्यामध्ये उपस्थित फायटोकेमिकल्स आणि अँथोसायनिनस कर्करोगाशी लढायला मदत करतात. मूत्रपिंड आणि आतड्यांसारख्या कर्करोगापासून शरीराचे रक्षण करते.

-मुळ्यामध्ये अँटी कंजेस्टिव्ह प्रॉपर्टीज असतात. जे कफ दूर करण्यात मदत करते. कफ झाल्यावर मुळ्याचा रस पिल्याने फायदा होतो. यामुळे कफ पातळ होऊन शरीराच्या बाहेर पडतो.

-मुळ्याच्या पानात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी तसेच क्लोरीन, फॉस्फरस, सोडियम, लोह, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटकांसह समृद्ध असतात, जे आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर असतात. मुळ्याची पाने खाल्लीतर पोटासंदर्भातील अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

(Radish leaves are extremely beneficial for health)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI