मनुके आणि अंजीर अशा प्रकारे खा, हिमोग्लोबीन वाढवण्यात करतील मदत
ड्रायफ्रुट्सच्या नावाखाली लोक मनुका सर्वाधिक खातात. पण यासोबतच अंजीर खाल्ल्यास त्यामुळे रक्त शुद्ध होते. अंजीर आणि मनुके एकत्र खालले तर याचा तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात. रात्री मनुके आणि अंजीर एकत्र भिजवून खाण्याचे काय आहेत फायदे जाणून घ्या.

मुंबई : चांगल्या फिटनेससाठी योग्य आणि संतुलित आहार फार महत्त्वाचा असतो. अनेक वेळा लोक चांगल्या आरोग्यासाठी केमिकलयुक्त सप्लिमेंट्स घेतात. पण नैसर्गिक गोष्टी खाल्ल्याने त्याच्या शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. मनुका आणि अंजीर हे दोन असे ड्राय फ्रूट आहेत ज्यांचे नियमित सेवन तुम्हाला आणि तुमच्या शरीराला अनेक फायदे देऊ शकतात. दोन्ही ड्राय फ्रुट्स एकत्र भिजवून खाल्ल्याने त्याचा मोठा फायदा होतो.
हाडे मजबूत होतात
अंजीरमध्ये कॅल्शियम भरपूर असते, तर दुसरीकडे मनुकामध्ये थायमिन आणि झिंक मोठ्या प्रमाणात असतात. दोन्ही भिजवून खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
त्वचा चमकेल
व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट त्वचेसाठी खूप चांगले मानले जातात. अंजीर आणि मनुका यामध्ये भरपूर प्रमाणात ते आढळतात तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक हवी असेल तर तुम्ही हे खाऊ शकता.
अशक्तपणा दूर होतो
लवकर थकवा येत असेल तर तुमच्या शरीरातील रक्ताची पातळी कमी असू शकते. अशा परिस्थितीत रक्त वाढवण्यासाठी तुम्ही मनुके आणि अंजीर यांचे नियमित सेवन केले पाहिजेय.
वजन नियंत्रित राहण्यास मदत
फायबरयुक्त आहारामुळे पोट कमी करण्यात मदत होते. अंजीर आणि मनुका यामध्ये उच्च फायबर ड्राय फ्रूट असतात. जे रोज खाल्ल्याने काही दिवसातच वजन नियंत्रणात येते.
पचनासाठी मदत
अन्न जर नीट पचत नसेल तर अनेक आजार होतात. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही मनुका आणि अंजीर याचे सेवन केले पाहिजे. हे खाल्ल्याने पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.
अस्वीकरण: वर देण्यात आलेली माहिती ही सामान्य माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. कोणतीही वैद्यकीय समस्या असली तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.