Republic Day 2021 | रंगीबेरंगी कपडेच नाही तर, ‘या’ गोष्टींनी बनवा यंदाच ‘प्रजासत्ताक दिन’ संस्मरणीय!

आज देशात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. देशप्रेमाचा हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जात आहे.

Republic Day 2021 | रंगीबेरंगी कपडेच नाही तर, ‘या’ गोष्टींनी बनवा यंदाच ‘प्रजासत्ताक दिन’ संस्मरणीय!
आज देशात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. द
Harshada Bhirvandekar

|

Jan 26, 2021 | 12:56 PM

मुंबई : आज देशात 72 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. देशप्रेमाचा हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जात आहे. एकीकडे राजपथावर भारताची विविधता आणि शक्ती दिसत असताना, देशातील प्रत्येक नागरिक हा देशभक्तीच्या रंगात रंगलेला आहे (Republic Day 2021 special look fashion ideas).

आज या खास दिवशी आपल्यापैकी बरेच लोक ध्वजांच्या रंगानुसार आणि पारंपारिक कपडे घालताना दिसतात. या प्रजासत्ताक दिनी, आपण परंपरेनुसार पांढर्‍या रंगाचा कुर्ता आणि स्कार्फ घेऊन स्वत:ला स्टायलिश बनवू शकता. परंतु, केवळ कपडेच नाही तर, आज या प्रजासत्ताक दिनी आपण स्वत:ला आणखी अनेक प्रकारे स्टाईल करू शकता. चला तर जाणून घेऊया या स्टायलिश पद्धती…

स्कार्फ आणि दुपट्टा

या खास दिवशी तुम्ही पारंपारिक पांढर्‍या कुर्तासह स्कार्फ किंवा दुपट्टा परिधान करू शकता. तर, पुरुष देखील पांढऱ्या कुर्त्यासह केशरी शाल किंवा मफलर परिधान करून स्टायलिश दिसू शकतात. त्याच वेळी, महिला साध्या पांढऱ्या कुर्त्यासह केशरी स्कार्फ किंवा दुपट्टा घेऊ शकतात.

स्नीकर

आपण स्नीकरसह आपला स्टायलिश लूक परिपूर्ण करू शकता. आपण जे काही परिधान कराल, त्यावर स्नीकर परिधान केल्यास आपला लूक नेहमी स्टायलिश दिसू शकतो. आपण या खास दिवशी पांढर्‍या आणि निळ्यारंगाचे स्नीकर्स परिधान करू शकता (Republic Day 2021 special look fashion ideas).

बांगड्या

महिला आपल्या पारंपारिक कपड्यांसह मॅचिंग बांगड्या घेण्यास कधीच विसरत नाहीत. या प्रजासत्ताक दिनी आपल्या पारंपरिक पोशाखासह तिरंगा डिझाइन असलेल्या बांगड्या घालून, आपण आपला लुक खास बनवू शकता.

आयमेकअप आणि नेल आर्ट

या प्रजासत्ताक दिनी आपण नेल आर्ट करून किंवा आपल्या डोळ्यांवर तिरंग्याचा मेकअप करुन हटके अंदाजात देशभक्ती दर्शवू शकता. आपण आपल्या डोळ्यांवर तिरंग्याचा रंग किंवा देशभक्तीपर असलेला एखादा शेड निवडून त्याने खास मेकअप करू शकता. याशिवाय आपण नेल आर्टवर तिरंगा डिझाइन बनवू शकता.

(Republic Day 2021 special look fashion ideas)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें