सारा तेंडुलकरचं टॉप सीक्रेट अखेर समोर, विश्वासच बसणार नाही, तुमच्या डोक्यात काय आलं?

Sara Tendulkar fitness secret : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर हे प्रोटीनयुक्त पेय पिते. साराने या प्रोटीन स्मूदीची रेसिपी शेअर केली. तिने तिचे फिटनेस सीक्रेट शेअर केले आहे. कसे तयार होते हे पेय?

सारा तेंडुलकरचं टॉप सीक्रेट अखेर समोर, विश्वासच बसणार नाही, तुमच्या डोक्यात काय आलं?
एनर्जी ड्रिंक
| Edited By: | Updated on: Aug 02, 2025 | 12:00 PM

Celebrity Fitness : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची लाडकी लेक सारा तेंडुलकर (Sara Tendulkar)असोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. तिचे सौंदर्य, फॅशन स्टाइल आणि ग्लॅमरस लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण सारा केवळ स्टाईलमध्येच नाही, तर फिटनेसच्या बाबतीतही तितकीच जागरूक आहे. साराने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला. त्यात तिने फिटनेस आणि तिच्या सुंदर त्वचेचं रहस्य उघड केले आहे. या व्हिडिओमध्ये सारा माचा स्मूदी (Matcha Smoothie) तयार करताना दिसत आहे. हे प्रोटीनने भरलेले खास ड्रिंक आहे. ते पिल्यानंतर एकदम ताजतवानं वाटतं, असा दावा आहे.

जपानी कॅफेचा फिल

स्मूदी पिल्यावर तुम्हाला एखाद्या जपानी कॅफेमध्ये बसल्याचा आणि हे एनर्जी ड्रिंक पित असल्याचा फिल येईल, असे सारा म्हणाली. साराने ही रेसिपी स्टेप बाय स्टेप शेअर केली आहे. स्मूदी तयार करण्यासाठी काय काय लागेल. याची यादी सुद्धा तिने दिली आहे. त्यासाठी 1-2 खजूर, 1 स्कूप व्हॅनिला प्रोटीन, एक स्कूप कोलेजन पेप्टाइड्स, एक चमचा माचा पाउडर (Matcha Powder), एक कप अनस्वीटेंड आल्मंड मिल्क आणि 1-2 चमचा अनस्वीटेंड आल्मंड बटर यासह काही बर्फाचे तुकड्यांची गरज आहे.

सारा तेंडुलकरची माचा स्मूदी रेसिपी:

वापरा हे साहित्य:

1 चमचा माचा पावडर

1 ग्लास बदाम दूध (किंवा कोणतेही प्लांट-बेस्ड दूध)

1 केळी (गोडवा आणि क्रीमी टेक्सचरसाठी)

थोडेसे स्पिरुलिना पावडर (अ‍ॅन्टीऑक्सिडंट्ससाठी)

1 चमचा प्रोटीन पावडर (सारा वेगन प्रोटीन वापरते)

बर्फाचे तुकडे

1 चमचा मध (नैसर्गिक गोडव्यासाठी)

असे तयार करा हे ड्रिंक :

  • सर्व साहित्य मिक्सरमध्ये टाका.
  • ते नीट ब्लेंड करा जोपर्यंत स्मूदी गुळगुळीत आणि एकसंध होईल.
  • एका ग्लासमध्ये ओता आणि लगेच प्या.
  • ही स्मूदी शरीराला ऊर्जा देते, त्वचेला नैसर्गिक चमक आणते आणि शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

टीप : माचा (Matcha) हे ग्रीन टीचे अधिक शक्तिशाली रूप आहे. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि नैसर्गिक कॅफीन असते जे शरीर आणि मन ताजं ठेवते.