Corona | प्रसुतीकाळात मातेपासून बाळाला कोरोनाचा धोका? काय सांगतोय नवीन अभ्यास…

Corona | प्रसुतीकाळात मातेपासून बाळाला कोरोनाचा धोका? काय सांगतोय नवीन अभ्यास...
pregnacy and corona

अभ्यासल्या गेलेल्या 14,271 मुलांपैकी केवळ 1.8 टक्के मुलांना सार्स-कोव-2 ची लागण झाल्याचे आढळून आले. संशोधकांनी सांगितले की, गर्भधारणेदरम्यान लसीकरणास अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे

मृणाल पाटील

|

Mar 18, 2022 | 11:34 AM

मुंबई : कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-19 आजारावर (Sars-Cov-2) करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे, की बाळाला प्रसूतीपूर्वी किंवा नंतर आईकडून संसर्ग (mother to child transmission) होण्याचा धोका अत्यंत कमी असतो. ‘बीएमजे’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात ही बाब समोर आली आहे. संशोधकांना आढळले आहे, की कोविडची लागण झालेल्या संक्रमित मातांच्या पोटी जन्मलेल्या मुलांची बाधित संख्या केवळ दोनच टक्के आहे. आईला कोविड-19 च्या गंभीर संसर्गाची लागण झाल्यास किंवा प्रसूतीनंतर संसर्ग झाल्यास बाळाला कोरोना व्हायरस होण्याचा धोका जास्त असल्याचेही अहवालात (analysis) नमूद करण्यात आले आहे.

यूकेच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातील संशोधकांच्या नेतृत्वाखालील एका टीमला असे आढळून आले आहे, की सामान्य पध्दतीने जन्मलेल्या आणि स्तनपान करवलेल्या बाळांना त्यांच्या मातांकडून संसर्ग होण्याची शक्यता कमी असते. संशोधकांनी जगभरातून डेटा गोळा केला आहे आणि कोरोना विषाणूची लागण झालेल्या मातांच्या पोटी जन्मलेल्या 14,000 हून अधिक बाळांचे निरीक्षण केले आहे. संशोधकांच्या मते, अभ्यासात समाविष्ट केलेल्या 14,271 मुलांपैकी केवळ 1.8 टक्के मुलांना SARS-Cov-2 ची लागण झाल्याचे आढळून आले. संशोधकांनी सांगितले, की गरोदर महिलांमध्ये संसर्ग आणि गंभीर आजार टाळण्यासाठी गर्भधारणेदरम्यान लसीकरणास अधिक प्रोत्साहन दिले पाहिजे.

स्तनपान करताना धोका नाही

गेल्या वर्षीपर्यंत कोरोना संसर्गाबाबत आणखी एक शंका घेतली जात होती, की कोविड संक्रमित मातेच्या स्तनपानामुळे मुलांना संसर्गाचा धोका होऊ शकतो. मात्र, यावरही केलेल्या संशोधन अभ्यासात ही शक्यता नाकारण्यात आली आहे. ‘पेडियाट्रिक रिसर्च’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधन अभ्यासानुसार, कोविड-संक्रमित मातेचे स्तनपान करून बाळामध्ये हा विषाणू पसरण्याची शक्यता नाही. यामध्ये, संशोधकांना असे आढळून आले, की मातेच्या दुधाच्या अगदी थोड्या भागामध्ये कोविड-19 शी संबंधित अनुवांशिक घटक असले तरी, ही गोष्ट नवजात मुलांमध्ये संसर्गाला कारण ठरु शकत नाही. या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी, यूएसएच्या कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी 110 स्तनपान करणाऱ्या महिलांच्या दुधाच्या नमुन्यांचे विश्लेषण केले. या महिलांनी मार्च ते सप्टेंबर 2020 दरम्यान त्यांचे दूध विद्यापीठाच्या मॉमीज मिल्क ह्युमन मिल्क बायोरिपॉझिटरीला दान केले.

110 महिलांपैकी 65 महिलांमध्ये कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली, तर 9 महिलांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली, मात्र त्या चाचणीत निगेटिव्ह आल्या. त्याच वेळी 36 मध्ये कोरोनाची सर्व लक्षणे दिसली, परंतु त्यांची चाचणी झाली नाही. संशोधक पॉल क्रोग्स्टॅड आणि इतर सहकाऱ्यांना असे आढळून आले, की ज्या सात महिलांच्या दुधात विषाणूचे अनुवांशिक घटक आढळून आले त्यांना एकतर कोरोनाची लागण झाली आहे किंवा त्यांना लक्षणे आहेत.

संबंधित बातम्या

कोरडे रंग पोहोचवू शकता डोळ्यांना मोठी हानी… रंगपंचमीला अशी घ्या काळजी

Holi special : होळी स्पेशल रेसिपी, आज बनवा स्वादिष्ट ‘बदाम थंडाई’, जाणून घ्या रेसिपी…

Holi 2022 : रंग खेळण्याच्या अगोदर केसांची अशा प्रकारे घ्या काळजी, रंगामुळे केस खराब होण्याचे राहणार नाही टेन्शन!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें