
त्वचेची नीट काळजी घेतली नाही तर त्वचेचं नुकसान होतं असं म्हणतात. पण काही वेळेस त्वचेची काळजी घेतानाही लोकं काही अशा चुका करतात ज्यामुळे फायदा न होता नुकसानच जास्त होतं. त्वचेची काळजी घेण्यासाठी योग्य उपाय करणं गरजेचं आहे. काही अशा सवयी आहेत, ज्या पुढल्या वर्षी, म्हणजेच 2023मध्ये तुम्ही सोडल्या पाहिजेत.

फेस वॉश : चेहरा स्वच्छ केल्याने आतील मळही स्वच्छ होतो. मात्र बरेचसे लोक दिवसातून केवळ एकदाच चेहरा धुण्याची चूक करतात. तुम्ही दिवसातून कमीत कमीत दोन वेळा तरी फेसवॉशच्या सहाय्याने त्वचा स्वच्छ केली पाहिजे.

सनस्क्रीनचा वापर : तुम्हालाही दिवसातून केवळ एकदाच सनस्क्रीन वापरण्याची सवय आहे का ? थंडी असो वा उन्हाळा, प्रत्येक ऋतूमध्ये कमीत कमी दोन वेळा तरी त्वचेला सनस्क्रीन लावले पाहिजे. सनस्क्रीनच्या वापरामुळे केवळ उन्हापासून संरक्षण होत नाही तर आपली त्वचाही चमकदार बनते.

पिंपल्स फोडणे : चेहऱ्यावर डार्क स्पॉट्स येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पिंपल्स फोडणे होय. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार आपण जेव्हा पिंपल्स फोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते चेहऱ्यावर पसरण्याची भीती असते. त्यामुळे डार्क स्पॉट्सही तयार होतात आणि दुसऱ्या जागी नवे पिंपल्स येऊ शकतात.

अपुरी झोप : चांगली व शांत झोप ही आपल्या आरोग्यासाठी व त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. झोप आपल्या शरीरासाठी किती महत्वपूर्ण असते हे माहीत असूनही लोक वाईट लाईफस्टाईल फॉलो करतात. त्यामुळे झोपेचे चक्र बिघडते आणि डार्क सर्कल्स येण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पुरेशा प्रमाणात झोप घेणे महत्वाचे आहे.