curd in dinner: रात्री जेवणात दही खावे का? पाहा आयुर्वेद यावर काय सांगते

curd at night : रात्रीच्या जेवणात दही खाणे योग्य आहे का. रात्रीच्या वेळी दही खाल्याने काय होऊ शकते. याबाबत आयुर्वेदात काय सांगितले आहे.

curd in dinner: रात्री जेवणात दही खावे का? पाहा आयुर्वेद यावर काय सांगते
curd
| Updated on: Oct 28, 2023 | 3:24 PM

Can you have curd for dinner?: दही, डाळ-भात आणि पापड हे उत्तम कॉम्बिनेशन आहे. आपण सर्वजण या घरगुती फूडची नेहमीच चव चाखत असतो. दही ही सर्वात लोकप्रिय साइड डिश आहे जी कधीही ट्रेंडच्या बाहेर जात नाही. ती नेहमीच जेवणात चव वाढवते. काही लोक त्याशिवाय जेवणच करत नाहीत. भात, डाळ किंवा पुलाव सोबत दही खायला आपल्या सर्वांना आवडते. आता अशा परिस्थितीत रात्रीच्या जेवणात दही खाणे योग्य आहे का असा प्रश्न पडतो अनेकांना पडलेला असतो.

दही खाण्याचे फायदे

खरं तर, दह्याचे आपल्या आतड्यांसाठी अनेक फायदे आहेत. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की रात्रीच्या जेवणात ते खाऊ नये. आयुर्वेदानुसार रात्रीच्या जेवणात दही खाणे योग्य आहे का?

आयुर्वेद डॉक्टर डॉ.दिक्षा भावसार सावलिया यांनी इंस्टाग्रामवर दही आणि रात्रीच्या जेवणाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की, ‘दही चवीला आंबट पण स्वभावाने उष्ण आहे. ते पचायला जड असते आणि जास्त वेळ लागतो. हे चरबी वाढवते, शक्ती सुधारते, कफ आणि पित्त वाढवते आणि पचनशक्ती सुधारते.

दही कोणी खाणे टाळावे?

आयुर्वेद डॉक्टर सांगितात की दही गरम करू नये कारण ते त्याचे गुणधर्म नष्ट करते. तज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा, कफाचे विकार, रक्तस्रावाचे विकार आणि दाहक स्थिती असलेल्या लोकांनी दही खाणे टाळणे उत्तम. या कारणांमुळे रात्री कधीही दही सेवन करू नये.

दिवसाच्या तुलनेत रात्री चयापचय कमी होते. रात्री दही खाल्ल्याने पोटात जडपणा येतो कारण ते पचायला जड असते. यामुळे शरीरात कफ वाढतो. ज्यामुळे मधुमेह, वजन वाढणे आणि कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होते. जर तुम्हाला रात्री दही खाण्याची सवय असेल तर ते टाळा किंवा त्या ऐवजी ताक घ्या.