AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care Tips : चेहऱ्यावर सुरकत्या आणि डाग पडू नये म्हणून ५ सोपे उपाय

Skin Collagen : सुंदर दिसायला प्रत्येकाला आवडतं पण त्यासाठी तशी काळजी देखील घेतली गेली पाहिजे. दररोज भरपूर पाणी पिले पाहिजे पण त्याकडे देखील आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. चेहरा सुंदर दिसण्यासाठी काही टीप्स.

Skin Care Tips : चेहऱ्यावर सुरकत्या आणि डाग पडू नये म्हणून ५ सोपे उपाय
foods-for-skin
| Updated on: Nov 16, 2023 | 4:30 PM
Share

Skin Care Tips : प्रत्येकाला नेहमीच सुंदर दिसावे असे वाटते. सुंदर दिसण्यासाठी आपली त्वचा ही सुंदर असली पाहिजे. परंतु वाढत्या वयामुळे हळूहळू आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात. निरोगी आणि चमकदार त्वचा असावी असं प्रत्येकाला वाटतं पण आपल्या जीवनशैलीमुळे ते शक्य होत नाही. बाजारात असे अनेक सौंदर्य उत्पादने आहेत जे बाह्य काळजीसाठी वापरले जातात. पण अंतर्गत काळजी कशी घ्यावी. सुरकत्या का पडतात. हे जाणून घेऊया.

कोलेजन हे एक प्रोटीन आहे जे आपल्या त्वचेला लवचिकता प्रदान करते. ज्यामुळे आपली त्वचा चमकते. नैसर्गिकरीत्या त्वचेतील कोलेजनची पातळी कशी वाढवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

कोलेजन वाढवण्याचे 5 मार्ग

1. हायड्रेटेड रहा

मऊ आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी भरपूर पाणी प्या. ज्यामुळे शरीर नेहमी हायड्रेटेड राहिल. दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी पिलेच पाहिजे. पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्याने कोलेजन वाढण्यास मदत होते.

2. पुरेसे अँटिऑक्सिडंट्स घ्या

अँटिऑक्सिडंट्स त्वचा डिटॉक्स करण्यास मदत करतात. पेशींमध्ये ऑक्सिजन आणि रक्त प्रवाह वाढवतात. त्वचेचे अतिनील हानीपासून संरक्षण करण्यासाठी आणि कोलेजन प्रथिनांची निर्मिती वाढवण्यासाठी देखील ओळखले जाते.

3. व्हिटॅमिन सी

त्वचेतील कोलेजन वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वाची भूमिका बजावतात. व्हिटॅमिन सीच्या सेवनाने तुमच्या त्वचेची श्वासोच्छ्वास क्षमता वाढते. चेहऱ्यावरील डागही हळूहळू नाहीसे होतात. त्यामुळे तुमच्या आहारात प्रामुख्याने व्हिटॅमिन सी समृद्ध भाज्या आणि फळांचा समावेश करा.

4. हंगामी फळे खा

फळांमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात जे त्वचेला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करतात. ऋतूनुसार फळांचे सेवन केल्याने तुम्हाला अतिरिक्त पोषक तत्वे मिळतात, जे तुम्हाला हवामान आणि त्याच्या परिणामांपासून वाचवण्यास मदत करतात.

5. भरपूर भाज्या खा

भाज्यांमध्ये ही अँटिऑक्सिडेंट असतात. जे त्वचेचे संरक्षण करतात. भाज्यांमध्ये असलेले पोषणतत्व त्वचेच्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात.

आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.