Skin Care | कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स नव्हे, ‘या’ नैसर्गिक उपायांनी मिळावा त्वचेचा तजेलदारपणा!

व्यस्त जीवनशैली, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुमं, डाग आणि सुरकुत्या यासारख्या समस्यांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत.

Skin Care | कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स नव्हे, ‘या’ नैसर्गिक उपायांनी मिळावा त्वचेचा तजेलदारपणा!

मुंबई : व्यस्त जीवनशैली, धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्यावर मुरुमं, डाग आणि सुरकुत्या यासारख्या समस्यांमुळे बरेच लोक त्रस्त आहेत. त्यातच थंड वाऱ्याच्या माऱ्यामुळे हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. अशावेळी त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करण्यास सुरुवात करतात. मात्र, या उत्पादनांचा चेहऱ्यावर कुठलाच उपयोग होत नाही. काहीवेळा या उत्पादनांमुळे इतर अनेक समस्या देखील उद्भवू शकतात (Skin care tips use natural products for glowing skin).

अशावेळी थेट कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सचा वापर करण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करता येऊ शकतो. काही घरगुती नैसर्गिक उपायांनी आपण निरोगी आणि चमकणारी त्वचा मिळवू शकता. त्याशिवाय त्वचेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील ‘या’ टिप्स आपण वापरू शकता ..

– दररोज झोपण्यापूर्वी प्रथम आपला दिवसभराचा मेकअप व्यवस्थित साफ करून, चेहरा स्वच्छ करा. आठवड्यातून दोनदा आपली त्वचा एक्सफोलिएट करण्यास विसरू नका. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचा निघून जाते आणि चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक परत येते.

– उन्हात जाण्यापूर्वी यूव्हीए आणि यूव्हीबी किरणे टाळण्यासाठी नेहमी एसपीएफ क्रीम वापरा. हिवाळ्यात बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणे विसरू नका.

– नेहमी निरोगी आणि संतुलित आहार घ्या. ताजे फळे, भाज्या, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचे सेवन करा. मसालेदार, तळलेले पदार्थ आणि मीठ कमी प्रमाणात खा.

– रात्रीसाठी एखाद्या अशा मॉइश्चरायझरची निवड करा ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट असतील. जर तुमचं मॉईश्चरायझर व्हिटामिन ए, सी, ई आणि बी 3 युक्त असेल तर तो तुमच्या त्वचेला पोषण देईल (Skin care tips use natural products for glowing skin).

– आजपासून साबणेला बाय बाय करा आणि एखाद्या सौम्य ब्युटी फेस वॉशचा वापर करण्यास सुरुवात करा. तसेच, रात्री झोपण्यापूर्वी आपला चेहरा नीट स्वच्छ करुन घ्या.

– केमिकल युक्त प्रोडक्ट्सचा वापर करणं कटाक्षाने टाळा. कुठलंही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी तुमच्या त्वचारोगतज्ज्ञचा सल्ला नक्की घ्या. आखणी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसे वाचवण्यासाठी कधीही प्रौडक्टच्या गुणवत्तेशी तडजोड करु नका.

व्यायाम करा

धावणे, जॉगिंग करणे आणि योगा या क्रिया आपल्याला दिवसभर सक्रिय ठेवतात. व्यायाम केल्यानंतर, आपण आपल्या स्किनकेअरच्या नियमांचे पालन केले पाहिजे. घामामुळे चेहऱ्यावर लालसरपणा, मुरुम आणि फोड्या येऊ शकतात.

चांगली झोप

दररोज 8 तासांची संपूर्ण झोप घ्या. दररोज झोपी जाण्यापूर्वी आपली त्वचा व्यवस्थित साफ करून मॉइश्चराइझ अवश्य करा.

हायड्रेशन

दररोज सुमारे 8 ग्लास पाणी प्या. पाणी आपल्या शरीरातील पीएच पातळी नियंत्रित करते आणि आपली त्वचा हायड्रेटेड ठेवते. जर आपल्या डोळ्यांखालील त्वचेला सूज येण्याची समस्या उद्भवत असेल, तर गुलाबजल वापरा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

(Skin care tips use natural products for glowing skin)

हेही वाचा :

Published On - 6:16 pm, Wed, 13 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI