Skin Care | त्वचा आणि केसांसाठी लाभदायी ‘दही’, वाचा याचे फायदे…

‘दही’ आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात सहज सापडते. दही आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Skin Care | त्वचा आणि केसांसाठी लाभदायी ‘दही’, वाचा याचे फायदे...
त्वचा
Follow us
| Updated on: Feb 01, 2021 | 11:31 AM

मुंबई : त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर केला जातो. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नियमित स्कीन केअर रुटीन पाळले पाहिजे. कारण त्यात त्वचेला पूरक घटक, जीवनसत्त्वे असतात, जे त्वचेतील कोलेजनला चालना देण्याचे काम करतात. परंतु, असे काही उपाय केले तरीही आपल्या त्वचेचा त्रास कमी होत नाही, अशावेळी दह्याचा वापर करून तुम्ही घरगुती उपचार करून पाहू शकता (Skin Care tips using curd).

‘दही’ आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकघरात सहज सापडते. दही आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे. चला तर, जाणून घेऊया दही वापरल्याने केस आणि त्वचेला बराच फायदा होतो.

टॅनिंग दूर करण्यासाठी फायदेशीर

दह्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे सर्नबर्न आणि टॅनिंगची समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरते. सन बर्न कमी करण्यासाठी त्वचेवर दही लावा आणि 15  मिनिटांनंतर त्वचा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. टॅनिंग काढून टाकण्यासाठी दह्यामध्ये 3 ते 4 चमचे बेसन पीठ आणि लिंबाचा रस घाला. आता ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि कोरडे होऊ द्या. मिश्रण चांगले कोरडे झाल्यावर त्वचा पाण्याने धुवा. आपल्याला काही दिवसांतच याचा फरक दिसून येईल.

मॉइश्चरायझर

दही सर्वोत्तम मॉश्चरायझर आहे. हे आपल्या त्वचेला नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. यासाठी त्यात एक चमचा मध आणि दोन चमचे दही मिसळा. हे मिश्रण त्वचेवर लावून काही वेळाने धुवा. हे नियमित वापरल्याने आपली त्वचा हायड्रेटेड आणि मॉइश्चराइज्ड दिसेल (Skin Care tips using curd).

मुरुमं कमी होतील

दह्यामध्ये नैसर्गिक अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. आपण इच्छित असल्यास, दह्याचा फेस मास्क तयार करून तो लावू शकता, यामुळे आपली मुरुमांची समस्या कमी होईल. याशिवाय मुरुमांमुळे येणारी खाज देखील दूर होईल.

केस

प्रत्येकाला मऊ, रेशमी आणि चमकदार केस हवे आहेत. जर तुम्हालाही या सर्व गोष्टी हव्या असतील तर तुम्ही केसांवर आणि स्काल्पवर दही लावू शकता आणि सुमारे 30 मिनिटे तसेच ठेवा. याशिवाय केसांना जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी कोरफड जेल, नारळाचे तेल दहीमध्ये मिसळून त्याचा हेअर मास्क तयार करू शकता.

डँड्रफ

दहीमध्ये अँटी फंगल गुणधर्म आहेत जे डोक्यातील कोंडा आणि स्काल्पशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामुळे खाज सुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळतो. डोक्यातील कोंडा दूर करण्यासाठी, दह्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घाला. या मिश्रणाने आपल्या स्काल्पची मालिश करा आणि कोरडे होऊ द्या. व्यवस्थित कोरडे झाल्यानंतर केस कोमट पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Skin Care tips using curd)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.