स्किन सायकलिंग म्हणजे काय? जाणून घ्या याचे फायदे आणि योग्य वापराची पद्धत
सध्या ‘स्किन सायकलिंग’ हा शब्द सौंदर्यविश्वात प्रचंड ट्रेंडमध्ये आहे. नाव जरी जिम वर्कआउटसारखं वाटत असलं, तरी ही एक आधुनिक आणि वैज्ञानिक स्किन केअर पद्धत आहे. चला, जाणून घेऊया या रूटीनमध्ये त्वचेची काळजी कशी घेतली जाते आणि याचे नेमके फायदे काय आहेत.

आजकाल सोशल मीडियावर एक नवा स्किनकेअर ट्रेंड जोरात व्हायरल होत आहे त्याचं नाव आहे स्किन सायकलिंग (Skin Cycling). नाव ऐकलं की असं वाटतं, जसं जिम वर्कआउटची पद्धत असावी, पण खरंतर ही आहे एक स्मार्ट आणि सायन्स-आधारित नाइट स्किनकेअर रूटीन. या ट्रेंडमुळे डर्मेटोलॉजिस्टही खूश आहेत आणि अनेक स्किन इन्फ्लुएन्सर्स याला फॉलो करत आहेत.
काय आहे स्किन सायकलिंग?
स्किन सायकलिंग म्हणजे स्किनला विश्रांती देण्याची एक नीट आखलेली रचना. आपली त्वचा रोज विविध प्रकारचे प्रोडक्ट्स झेलते कधी एक्सफोलिएटर, कधी रेटिनॉल, कधी सीरम. त्यामुळे स्किन थकते आणि तिच्या नॅचरल रिपेअर प्रक्रियेला वेळ मिळत नाही. स्किन सायकलिंग हाच एक उपाय आहे ज्यामध्ये चार रात्रींच्या फॉर्म्युल्यावर आधारित स्किनकेअर रूटीन असतं.
स्किन सायकलिंग कशी केली जाते?
रात्र 1 – एक्सफोलिएशन : चेहरा स्वच्छ धुवून सॅलिसिलिक किंवा ग्लायकोलिक ॲसिड असलेलं केमिकल एक्सफोलिएटर वापरा. यामुळे डेड स्किन निघते आणि इतर प्रोडक्ट्स अधिक प्रभावी होतात. त्यानंतर हलकं मॉइश्चरायझर लावा.
रात्र 2 – रेटिनॉइड : दुसऱ्या दिवशी चेहरा स्वच्छ करून रेटिनॉल लावा. जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल, तर आधी मॉइश्चरायझर लावा, जेणेकरून स्किनला धक्का बसणार नाही.
रात्र 3 आणि 4 – रिकव्हरी : या रात्री काहीही ऍक्टिव्ह प्रोडक्ट्स वापरायचे नाहीत. फक्त क्लिंझर, हायड्रेटिंग सीरम आणि जाडसर मॉइश्चरायझर लावायचं. यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या स्वतःला रिपेअर करू शकते.
लागणारी सामग्री:
- एक्सफोलिएटर: ग्लायकोलिक ॲसिड किंवा सॅलिसिलिक ॲसिडयुक्त प्रोडक्ट्स.
- रेटिनॉइड: OTC रेटिनॉल किंवा डॉक्टरने सांगितलेले ट्रेटिनॉइन.
- मॉइश्चरायझर: सौम्य, सुगंधरहित आणि स्किन सॉफ्ट करणारे.
आपल्या स्किनप्रमाणे रूटीन बदलता येईल
जर तुमची त्वचा सेंसिटिव असेल, तर रिकव्हरीच्या रात्री 2 ऐवजी 3 ठेवा. आणि जर तुम्हाला ऍक्टिव्ह प्रोडक्ट्सची सवय असेल, तर रिकव्हरीचे दिवस कमी करून सायकलिंग कमी अंतराने करा.
स्किन सायकलिंगचे फायदे
1. स्किनचा नैसर्गिक बॅरियर मजबूत होतो.
2. रेडनेस, जलन किंवा पिग्मेंटेशन कमी होण्यास मदत होते.
3. हवामानानुसार त्वचेचं रक्षण होतं.
4. स्किन टाईमसह ग्लो करू लागते, फाइन लाइन्स कमी होतात.
कोणी करायला हवं हे रूटीन?
जर तुम्हाला रेटिनॉल लावताच त्वचेवर जलन होते किंवा स्किनला इरिटेशन वाटतं, तर स्किन सायकलिंग योग्य पर्याय ठरू शकतो. पण सुरूवात सौम्य प्रोडक्ट्सपासून करा, पैच टेस्ट करा आणि शक्य असेल तर डर्मेटोलॉजिस्टचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
