AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!

Sleep Divorce : अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

प्रेम वाढवण्यासाठी वेगवेगळं झोपा, नवरा-बायकोमध्ये सध्या वेगळीच क्रेझ; नव्या ट्रेंडची का होतेय चर्चा!
sleep divorce trendImage Credit source: Google
| Updated on: Jul 05, 2026 | 4:51 PM
Share

एकाच बेडवर झोपणे हे पती-पत्नीच्या मजबूत नात्याचे प्रतीक मानले जाते. मात्र आता परदेशात अनेक जोडपी या पारंपरिक विचारापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारत आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि इतर अनेक देशांमध्ये स्लीप डिव्होर्स म्हणजेच वेगवेगळ्या खोलीत किंवा स्वतंत्र बेडवर झोपण्याचा ट्रेंड वाढला आहे. अनेकांना हे वाचून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल असं वाटत असेल, मात्र प्रत्यक्षात चित्र याच्या अगदी उलट आहे. अनेकांच्या मते, यामुळे केवळ चांगली झोपच मिळत नाही, तर नात्यातील प्रेम, समजूतदारपणा आणि संवादही अधिक मजबूत होतो. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

नवरा बायको वेगवेगळे का झोपत आहेत?

नवरा बायको एकत्र झोपतात तेव्हा काही जोडप्यांना त्रासाचा सामना करावा लागतो. जोडीदाराचे मोठ्याने घोरणे, रात्री वारंवार कुशी बदलणे, झोपण्याची किंवा उठण्याची वेगवेगळी वेळ, मोबाईलचा वापर यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या झोपेवर परिणाम होतो. अनेक दिवस पुरेशी झोप न झाल्यास याचा परिणाम मूड, मानसिक आरोग्य आणि नातेसंबंधांवरही होतो. याच कारणामुळे अनेकजण रात्री स्वतंत्र खोलीत किंवा वेगळ्या बेडवर झोपण्याचा पर्याय निवडत आहेत. यामुळे दोघांनाही आपल्या सोयीनुसार शांत झोप घेता येते आणि सकाळी फ्रेश वाटते. तज्ज्ञांच्या मते, पुरेशी आणि दर्जेदार झोप व्यक्तीला शांत, संयमी आणि भावनिकदृष्ट्या संतुलित ठेवण्यास मदत करते. त्यामुळेच जोडपी हा पर्याय निवडत आहेत.

हा ट्रेंड कोण स्वीकारत आहे?

वेगवेगळे झोपण्याची ही पद्धत केवळ वयोवृद्ध जोडपी नव्हे तर तरुण जोडपीही स्वीकारत आहेत. काहींचे ऑफिस उशिरापर्यंत सुरू असते, तर काहींना सकाळी लवकर उठावे लागते. त्यामुळे दोघांच्या दिनचर्येत फरक असल्याने एकमेकांच्या झोपेवर परिणाम होतो. तसेच लहान मुलं असलेल्या कुटुंबांमध्येही आई-वडील मुलाची आळीपाळीने काळजी घेण्यासाठी स्वतंत्र झोपण्याचा निर्णय घेतात, यामुळे दोघांनाही चांगला आराम मिळतो.

वेग वेगळं झोपण्याचा नात्यावर परिणाम होतो का?

महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळे झोपणे म्हणजे नात्यातील प्रेम कमी झाले, असं नाही. रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, मजबूत नाते हे फक्त एकाच बेडवर झोपल्याने तयार होत नाही, तर एकत्र घालवलेला वेळ, संवाद, परस्पर विश्वास आणि भावनिक नात्यावर ते अवलंबून असते. अनेक जोडपी झोपण्यापूर्वी एकत्र वेळ घालवतात, गप्पा मारतात आणि त्यानंतर चांगल्या झोपेसाठी आपापल्या खोलीत जातात.

जर एखाद्या व्यक्तीची झोप अपुरी राहिल्यास काही काळानंतर चिडचिड वाढू शकते आणि छोट्या-छोट्या कारणांवरून वाद वाढू शकतात. मात्र पुरेशी झोप मिळाल्यास तणाव कमी होतो आणि नात्यात संयम, सकारात्मकता आणि समजूतदारपणा टिकून राहतो. त्यामुळे परदेशातील अनेक जोडपी ही पद्धत नाते तुटू नये म्हणून नव्हे, तर ते अधिक मजबूत आणि आनंदी बनवण्यासाठी स्वीकारत असल्याची माहिती समोर आली आहे.

Follow Us
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा
'मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश'
आशिष शेलार यांचे मुंबईतील शाळा तपासणी अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरण्याचे आदेश
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्रात शेतकऱ्यांना दिलासा: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी, CM Fadnavis यांची प्रतिक्रिया
'2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'- विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar On Devendra Fadnavis : '2029 पर्यंतच फडणवीसांना पंतप्रधान होण्याची संधी'