Health Tips | दुपारच्या वेळी ‘वामकुक्षी’ घेताय? आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते ही सवय! वाचा दुष्परिणामांबद्दल…

बर्‍याच लोकांना दुपारच्या वेळी झोपायला आवडते. अन्न खाल्ल्यानंतर, प्रत्येकाला छानशी झोप घेणे आवडते. विशेषत: सकाळी लवकर उठून दिवसभर काम केल्यावर, घरतील महिला दुपारी झोपी जातात.

Health Tips | दुपारच्या वेळी ‘वामकुक्षी’ घेताय? आरोग्याच्या दृष्टीने महागात पडू शकते ही सवय! वाचा दुष्परिणामांबद्दल...
झोप
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 2:55 PM

मुंबई : बर्‍याच लोकांना दुपारच्या वेळी झोपायला आवडते. अन्न खाल्ल्यानंतर, प्रत्येकाला छानशी झोप घेणे आवडते. विशेषत: सकाळी लवकर उठून दिवसभर काम केल्यावर, घरतील महिला दुपारी झोपी जातात. केवळ विज्ञानच नाही, तर आपल्या शास्त्रात असेही म्हटले आहे की, दुपारी झोपल्यामुळे शरीरात वात दोष निर्माण होतात. म्हणून, शक्यतो दुपारच्या वेळी झोपू नये. शास्त्रात असे म्हटले आहे की, उर्जा देणारा सूर्य जर जागृत असेल, तर अशा परिस्थितीत आपण झोप घेणे योग्य नसते (Sleeping in afternoon is harmful for health).

त्याच बरोबर, आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, दुपारी झोपेमुळे अन्न चांगले पचत नाही. ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचनची समस्या निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त, दुपारी झोपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा आणि मधुमेह होण्याचा धोका देखील वाढतो.

टोकियो विद्यापीठाचा अभ्यास म्हणतो…

टोकियो विद्यापीठाने आपल्या अभ्यासात म्हटले आहे की, दुपारच्या वेळात एका तासापेक्षा जास्त वेळ झोपलेल्या लोकांमध्ये टाईप-2 मधुमेहाचा धोका 45 टक्क्यांनी वाढतो. संशोधनात असे आढळले आहे की, दुपारच्या वेळी 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ झोपणे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे. तथापि, या वेळेत 40 मिनिटांपेक्षा कमी झोपलेल्या लोकांमध्ये मधुमेहाचा धोका दिसून आला नाही.

कसरत आणि झोप

व्यायाम केल्यानंतर लगेच झोपू नये, असे संशोधकांचे म्हणणे आहे. व्यायामाच्या किमान 2 तासांनंतरच आवश्यक तितकी झोप घ्या (Sleeping in afternoon is harmful for health).

दुपारी झोप का टाळावी?

जर, आपल्याला झोप येत नसेल, तर आपण दिवसा झोपणे शक्यतो टाळावे. तज्ज्ञांचे असे मत आहे की, 50 टक्के लोकांना दिवसा झोपेचा फायदा होत नाही. या लोकांमध्ये सर्काडियन रिदम असतो. शरीरात उपस्थित सर्काडियन रिदम आपल्याला कधी झोपायचे, केव्हा जागृत व्हायचे, हे सांगतो. आपल्याला झोपेची आवश्यकता आहे की, नाही हे ही तोच दर्शवतो. मात्र, जर तुम्ही खूपच थकलेले असाल, तर तुम्ही या वेळी झोप घेऊ शकता.

दुपारच्या झोपेचे असेही दुष्परिणाम :

– दुपारच्या झोपेमुळे कफदोष आणि पचनाचे दोष निर्माण होतात. याचसोबत शरीरात मेदाचाही संचय होतो. त्यामुळे या व्याधींपासून लांब राहायचं असेल तर दुपारची झोप टाळलेलीच बरी.

– दुपारच्या झोपेमुळे कफदोष वाढतो. यामुळे शरीरावरील एखाद्या जखमेत पस निर्माण होऊन, ती जखम चिघळू शकते.

– यावेळी झोपण्यामुळे कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते.

– दुपारच्या झोपेमुळे पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.

(टीप : सदर माहिती सामान्य माहितीवर आधारित असून, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

(Sleeping in afternoon is harmful for health)

हेही वाचा :

Obesity | नेहमीपेक्षा 15 मिनिटही कमी झोप वाढवू शकते लठ्ठपणाची समस्या, निर्माण होऊ शकतो रक्तदाबाचा धोका!

Heart Disease | दैनंदिन जीवनातल्या ‘या’ गोष्टी वाढवतात हृदयविकाराचा धोका, जाणून घ्या याबद्दल…

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.