Eating Habits | उभं राहून जेवायची सवय लागलीय? वाचा याचे मोठे दुष्परिणाम…

आपण बर्‍याच अशा सवयी विकसित केल्या आहेत, ज्या आपल्या शरीराला सतत आजारांचा वेढा घालत असतात. यापैकी एक सवय म्हणजे उभे राहून खाणे.

Eating Habits | उभं राहून जेवायची सवय लागलीय? वाचा याचे मोठे दुष्परिणाम...
उभं राहून जेवण्याची सवय घातक

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातली स्वतःच्या सोयी लक्षात घेता, आपण बर्‍याच अशा सवयी विकसित केल्या आहेत, ज्या आपल्या शरीराला सतत आजारांचा वेढा घालत असतात. यापैकी एक सवय म्हणजे उभे राहून खाणे. लग्न, मेजवानीत तर हा एक संस्कृतीचा एक भाग बनला आहे. ऑफिसमध्ये आणि घरी तर आपण हे आपल्या स्वतंत्र इच्छेनुसार आणि सोयीनुसार करतो. परंतु आपण या सवयीला वेळेत निरोप दिला नाही, तर भविष्यात आपल्याला याची खंत बाळगावी लागेल. चला तर, उभे राहून जेवणाचे किंवा अन्न खाण्याचे तोटे जाणून घेऊया…( Eating food in standing position can be harmful for health)

उभं राहून जेवण्याचे दुष्परिणाम :

– खरं तर जेव्हा आपण उभे राहून अन्न खातो तेव्हा त्यावेळी आपली आतडे संकुचित होते आणि अन्न योग्य प्रकारे पचन होत नाही. याचा आपल्या पाचन तंत्रावर वाईट परिणाम होतो आणि आपल्याला अपचन, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा समस्या उद्भवतात. कधीकधी यामुळे अस्वस्थ देखील वाटू शकते.

– जर तुम्ही उभे राहून खाल्ले, तर अन्न थेट आतड्यांमध्ये जाते. अशा परिस्थितीत ओटीपोटात दुखणे आणि सूज येणे ही समस्या निर्माण होऊ शकते. याशिवाय, उभे राहून अन्न खाण्याने योग्य पचन होत नाही, ज्यामुळे शरीरात चरबी आणि कॅलरी साठवल्या जातात आणि आपला लठ्ठपणा वाढतो.

– जर तुम्ही रोज उभे राहून अन्न खाल्ले, तर घशातून पोटात अन्न आणि पाणी वाहून नेणारी अन्ननलिकेच्या खालच्या भागावर परिणाम होतो. यामुळे अल्सरची समस्या उद्भवू शकते.

– उभे राहून खाणे आपल्या पाय आणि कंबरेवरही परिणाम करते. अशा परिस्थितीत त्यांच्यात वेदना होऊ लागतात. याशिवाय जेव्हा आपण उभे राहून जेवतो, तेव्हा आपले मन विश्रांती घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीत ही सवय चिडचिडेपणा वाढवते (Eating food in standing position can be harmful for health).

– काही लोक असेही मानतात की, उभे राहून अन्न खाल्ल्याने किडनीच्या समस्या आणि मुतखडा होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

जेवण्याचा ‘हा’ आहे योग्य मार्ग!

अन्न नेहमीच जमिनीवर मांडी घालून, बसून खावे. तसेच, लहान लहान घास योग्य प्रकारे चावले पाहिजेत. वास्तविक अन्न आपल्या शरीरास जगण्याची शक्ती प्रदान करते. आपल्या पूर्वजांनी जमिनीवर मांडी घालून अन्न खाण्याची परंपरा सुरु केली होती, त्यामागे त्यांचा एक खोल विचार होता. जेव्हा आपण जमिनीवर मांडी घालून बसतो, तेव्हा आपण योगासनेच्या एका विशेष अवस्थेत असतो, ज्यास सुखासन म्हणतात. सुखासन पद्मासनातून आरोग्याशी संबंधित सर्व फायदे प्रदान करते. यामुळे पचन आरोग्यदायी होते, मन एकाग्र राहते आणि अन्नाचे पोषक पदार्थ आपल्या शरीरात योग्यप्रकारे पोहोचतात. तसेच, यामुळे पोट भरते आणि समाधानही वाटते.

(Eating food in standing position can be harmful for health)

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI