रोज रात्री पाण्यात मनुके भिजवून सकाळी खाल्ल्याने शरीराला मिळतात आश्चर्यकारक फायदे
किसमिस किंवा मनुके हे आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात. पण त्यात रोज रात्री पाण्यात किसमिस किंवा मनुके भिजवून ते सकाळी खाण्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. जाणून घेऊयात मनुके खाण्याचे योग्य प्रमाण आणि पद्धत काय आहे ते.

मनुके त्यांच्या विशेष गुणधर्मांसाठी ओळखले जातात. सुक्या मेव्याचा वापर अनेकदा गोड पदार्थ किंवा खीरची चव वाढवण्यासाठी केला जातो. मनुके हे एक उत्तम ड्राय फ्रुट्स मानलं जातं.ते त्याच्या पोषक तत्वांसाठी देखील ओळखले जाते, जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मनुके जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतात, म्हणूनच त्यांना एक सुपर ड्राय फ्रूट म्हणून देखील ओळखले जाते.
रात्री पाण्यात मुनके भिजवून ते सकाळी खाल्ले तर त्याचे चमत्कारिक फायदे मिळतात
जर दररोज रात्री थोडेसे मनुके पाण्यात भिजवून ते सकाळी खाल्ले तर त्याचे चमत्कारिक फायदे आपल्या शरीराला मिळतात. तर मनुके खाण्याचे फायदे आणि ते खाण्याची योग्य वेळ तसेच प्रमाण काय असावे हे जाणून घेऊया.
रक्ताची कमतरता दूर करा
मनुका हे लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचा चांगला स्रोत मानले जाते. म्हणून, जर तुमच्यात लोहाची कमतरता असेल तर दररोज रात्री 8 ते 10 मनुके पाण्यात भिजवा. त्यानंतर, दररोज सकाळी नाश्त्यापूर्वी हे मनुका खा. यामुळे अशक्तपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते
मनुका हा ऊर्जेचा एक उत्तम स्रोत मानला जातो. ज्यांचे आरोग्य खराब आहे त्यांना दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मनुका खाण्याचा सल्ला दिला जातो. मनुके भिजवून ठेवणे हा त्यांचा सर्वोत्तम मार्ग आहे. मनुका खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, हंगामी आजार किंवा सर्दी टाळता येते. मनुका खाल्ल्याने शरीराला संसर्गाशी लढण्याची ताकद मिळते.
पचन चांगले होते
मनुक्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे अन्न पचण्यास सोपे होते. त्यात असलेले पोषक तत्व संपूर्ण पचनसंस्थेला आराम देतात. मनुक्यांचा उष्णतेवर परिणाम होतो. त्यांना भिजवून खाल्ल्याने आम्लतासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
त्वचा चमकदार होते
मनुक्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर असतात. दररोज 8-10 भिजवलेले मनुके खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या दूर होतात, रंग उजळतो. चेहरा ताजा आणि तरुण दिसतो. वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास देखील हे प्रभावी असतात.
शरीराला डिटॉक्स करते
मनुका आपल्या शरीरातील सर्व वाईट विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतो. ते खाल्ल्याने शरीर आतून स्वच्छ होते. म्हणून, दररोज मनुके खाल्ल्याने आरोग्य नक्कीच सुधारू शकते.
टीप: मनुके कितीही आरोग्यदायी असले तरी देखील ते खाण्याचे प्रमाण हे 7 ते 8 मनुके एवढंच असावं. जास्त प्रमाणात मनुके खाल्ले आणि तेही न पाण्यात भिजवता तर पोट बिघडू शकते. त्रास होऊ शकतो. त्यासाठी खाताना काळजी घ्यावी.
