COVID-19 Pandemic : कोरोना काळात सकारात्मक राहण्यासाठी ‘या’ 6 टिप्स नक्की फाॅलो करा!

| Updated on: May 12, 2021 | 12:42 PM

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे.

COVID-19 Pandemic : कोरोना काळात सकारात्मक राहण्यासाठी या 6 टिप्स नक्की फाॅलो करा!
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात अनेक ठिकाणी लाॅकडाऊन लावण्यात आले आहे. यादरम्यानच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे भीती, चिंता आणि तणाव निर्माण झाला आहे. दैनंदिन जीवनात यामुळे बरेच बदल देखील झाले आहेत. अशा परिस्थितीत, घरातून काम, ऑनलाइन शाळा, बेरोजगारीची भीती निर्माण झाली आहे. परंतु, अशा परिस्थितीत सकारात्मक रहाणे फार महत्वाचे आहे. चला सकारात्मक राहण्याचे 6 सोपे मार्ग जाणून घेऊयात. (Special tips for staying positive during the Corona period)

ध्यान करा – नेहमीच ध्यान करण्याचा सल्ला दिला जातो. ध्यान केल्याने आपले मन शांत आणि निरोगी राहते. आपल्याला ध्यान कसे करावे हे माहित नसल्यास आपण ते ऑनलाइन देखील शिकू शकता. ध्यान केल्याने आपण शांत आणि आनंदी राहतो. विशेष म्हणजे ध्यान केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट रहा – कोरोनाच्या काळात आपण कोणाच्याही घरी न जाता आपण त्यांच्याशी कनेक्ट राहू शकतो. यासाठी आपण व्हिडिओ कॉल करू शकता, ऑनलाइन चॅट करू शकता.

व्यायाम करा – व्यायाम हा आपल्या नित्यकर्माचा एक भाग असावा. हे आपल्याला शारीरिकदृष्ट्या निरोगी ठेवते. व्यायामामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन बाहेर पडते, यामुळे सकारात्मकतेच्या भावनांना उत्तेजन मिळते. म्हणून नियमित व्यायाम करा.

छंद जोपासा – आपल्या स्वयंपाक, शिवणकाम, पुस्तके वाचणे, चित्र काढणे असे काही आवडत असेल तर या लाॅकडाऊन दरम्यान आपण छंद जोपासले पाहिजे. 10 वर्षांपूर्वी आपण वाचलेल्या पुस्तकाचे पुन्हा वाचन करा आणि तसा आनंद पुन्हा मिळवा.

चांगली झोप घ्या – लॉकडाऊन दरम्यान चांगली झोप घेणे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. साधारण ते आठ तास झोप घ्या. यामुळे आपली सकारात्मकता वाढण्यास मदत होईल.

घरात चाला – नियमित ठरवून चालले पाहिजे. चालताना मन दुसऱ्या कामांमध्ये न गुंतवता, अथवा इतर कुठल्याही विचारात गढून न राहता फक्त चालत राहिले पाहिजे. चालण्याच्या व्यायामामुळे फुप्फुसांची क्षमता वाढते, मनस्थिती सुधारते, प्रतिकारशक्ती वाढते, अन्न पचन करण्याच्या क्रियेत वाढ होते, मधुमेहाचा धोका कमी होतो, स्मरणशक्ती तल्लख होते, असे अनेक फायदे आहेत. म्हणूनच तंदुरुस्त आणि निरोगी शरीरासाठी चालण्याचा व्यायाम केलाच पाहिजे.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

(Special tips for staying positive during the Corona period)