प्रेशर कुकरवरील हट्टी डाग जाता जात नाहीये? तर ‘या’ 3 ट्रिक्सच्या मदतीने काही मिनिटांत करा दूर
तुम्ही जर प्रेशर कुकरवरील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी काही घरगुती उपाय करण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या टिप्स घेऊन आलो आहोत, ज्यांचा अवलंब केल्याने तुमचा प्रेशर कुकर एकदम नवीन असल्यासारखा चमकदार होईल. चला तर मग जाणून घेऊयात...

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात प्रेशर कुकर असतोच. झटपट जेवण बनवण्यासाठी आपण प्रेशर कुकरचा वापर करतो. तर यात वरण-भात, भाज्या असे अनेक प्रकार आपण कुकरमध्ये शिजवतो. तर प्रेशर कुकरमध्ये भाज्या वरण शिजवल्याने त्यातील तेलाचे आणि मसाल्याचे डाग चिकटून राहतात. यामुळे प्रेशर कुकरही हट्टी डागांमुळे खराब दिसतो. तर हे हट्टी डाग काढण्यासाठी तासनतास मेहनत करून तुम्ही कंटाळला आहात का? तर काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला 3 सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमचा जुना प्रेशर कुकर काही मिनिटांतच नवीन असल्यासारखा चमकू लागेल. या पद्धती केवळ स्वस्त नाहीत तर तुमचा वेळ आणि मेहनत देखील वाचवतील. चला जाणून घेऊयालिंबू आणि मीठ
लिंबू आणि मीठ यांचे मिश्रण हे प्रेशर कुकरमधील हट्टी डाग काढून टाकण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे.
कसे वापरायचे?
एक लिंबू अर्धा कापून घ्या.
लिंबाच्या कापलेल्या बाजूला थोडे मीठ लावा.
आता हे लिंबू प्रेशर कुकरच्या डाग असलेल्या भागांवर नीट चोळा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडे अधिक मीठ टाकू शकता.
काही वेळ घासल्यानंतर, 5-10 मिनिटे तसेच राहू द्या.
कोमट पाण्याने आणि स्क्रबरने प्रेशर कुकर स्वच्छ करा. यामुळे डाग सहज निघून जातील.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
बेकिंग सोडा आणि पांढरा व्हिनेगर एकत्र करून एक पॉवरफुल क्लिनिंग एजंट तयार होतो. जो सर्वात कठीण डाग देखील काढून टाकू शकतो.
कसे वापरायचे?
प्रेशर कुकरमध्ये 2-3 कप पाणी टाका.
त्यात 2 चमचे बेकिंग सोडा आणि अर्धा कप पांढरा व्हिनेगर टाका.
आता प्रेशर कुकर झाकून ठेवा आणि मंद आचेवर 10-15 मिनिटे गरम करा. लक्षात ठेवा, त्यावर शिट्टी लावू नका.
गॅस बंद केल्यानंतर, कुकर थंड होऊ द्या.
कुकर थंड झाल्यावर पाणी काढून टाका आणि स्पंज किंवा स्क्रबरने घासून घ्या. डाग लगेच निघून जातील.
डिटर्जंट आणि कोमट पाणी
कधीकधी डिटर्जंट आणि गरम पाणी यांचे मिश्रण देखील चिकटलेले हट्टी डाग काढून टाकण्यासाठी खूप प्रभावी ठरते.
कसे वापरायचे?
प्रेशर कुकरमध्ये पुरेसे पाणी भरा जेणेकरून डाग आणि चिकट भाग पूर्णपणे बुडतील.
त्यात तुमच्या डिशवॉशिंग डिटर्जंटचे काही थेंब किंवा 1-2 चमचे डिटर्जंट पावडर टाका.
आता पाणी चांगले उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करा आणि 20-30 मिनिटे किंवा रात्रभर तसेच कुकर तसेच राहू द्या.
दुसऱ्या दिवशी हे पाणी काढून टाका आणि स्क्रब पॅडने घासून घ्या. डाग सहज निघून जातील.
या सोप्या आणि प्रभावी ट्रिक्ससह, तुम्ही तुमचा प्रेशर कुकर नेहमीच नवीन आणि चमकदार ठेवू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
