उन्हाळ्यात टॅनिंगमुळे चेहरा लपवण्याची गरज नाही ! ‘या’ 5 टिप्समुळे तुमची त्वचा होईल चमकदार
सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपली त्वचा टॅन होते. ज्यामुळे त्वचेचा रंग काळवंडलेला आणि निर्जीव दिसू लागतो. टॅनिंगमुळे त्वचेची नैसर्गिक चमकही कमी होते. उन्हाळ्यात ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता.

उन्हाळ्यात आपण आपल्या आरोग्यासोबतच त्वचेची सर्वात जास्त काळजी घेत असतो. कारण या दिवसांमध्ये तीव्र सूर्यप्रकाश आणि प्रदूषणाचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे त्वचेचा रंग गडद दिसू लागतो. त्यामुळे टॅनिंगची समस्या निर्माण होते. टॅनिंगमुळे त्वचेची नैसर्गिक चमक देखील कमी होते. चेहऱ्यावरील निस्तेजपणामुळे आत्मविश्वासही कमी होऊ लागतो. अशावेळेस आपण उन्हाळ्यात आपल्या त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते.
काही लोक टॅनिंगची समस्या टाळण्यासाठी ब्युटी क्रीम वापरतात. पण त्यात असलेले कॅमिकल त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. त्वचेवरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. यामुळे त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. यासाठी आजच्या या लेखात आपण काही सोप्या टिप्सबद्दल जाणून घेऊयात…
लिंबाचा रस
लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीच आहे आणि त्यात व्हिटॅमिन सीचे प्रमाण देखील भरपूर असते. अशातच तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लिंबाचा वापर करून त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यास मदत होते. तसेच लिंबाचा रस त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते. तुम्ही गुलाब पाण्यात लिंबाचा रस मिसळून टॅन झालेल्या भागावर लावू शकता. 10 ते 15मिनिटांनी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
कोरफड जेल
कोरफड जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे केवळ त्वचेला हायड्रेट करत नाही तर टॅनिंग देखील कमी करते. तुम्ही ताजे कोरफडीचे जेल काढून ते त्वचेवर 15-20 मिनिटे लावू शकता आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा.
दही आणि हळदीचा पॅक
दही आणि हळदीचा फेस पॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते, जे त्वचेला एक्सफोलिएट करते आणि हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेचा रंग उजळवतात. एक चमचा दह्यात चिमूटभर हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि 15-20मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा. हा पॅक त्वचेला टॅनिंगपासून मुक्त करण्यास मदत करेल.
ओटमील स्क्रब
ओटमील हे एक चांगले स्क्रब आहे, जे त्वचेला खोलवर स्वच्छ करते. दुधात ओटमील मिसळून पेस्ट बनवा आणि टॅन झालेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करा. हे केवळ टॅनिंग कमी करत नाही तर त्वचा मऊ देखील करते.
टोमॅटोचा रस
टोमॅटोमध्ये लायकोपिन असते, जे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करते. टोमॅटोचा रस त्वचेवर लावल्याने त्याचा रंग उजळतो. यामुळे त्वचा खूप मऊ आणि चमकदार होते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
