धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

धुम्रपान केल्याने कर्करोगासारखा भयानक आजार होतो. त्यामुळे धुम्रपान करु नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मात्र, कर्करोग होण्याचं हे एकमेव कारण नाही. कर्करोग हा आजार अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत लठ्ठ लोकांना कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे.

धुम्रपानच नाही, तर लठ्ठपणामुळेही कॅन्सर होतो : सर्व्हे

मुंबई : धुम्रपान केल्याने कर्करोगासारखा भयानक आजार होतो. त्यामुळे धुम्रपान करु नये, यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीही केली जाते. मात्र, कर्करोग होण्याचं हे एकमेव कारण नाही. कर्करोग हा आजार अनेक गोष्टींमुळे होऊ शकतो. धुम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत लठ्ठ लोकांना कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो, असं नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात समोर आलं आहे. यूकेच्या कॅन्सर रिसर्चतर्फे हा अभ्यास घेण्यात आला. यानुसार, यूकेतील जवळपास एक तृतियांश लोकं लठ्ठपणाने ग्रस्त आहेत.

यूकेमध्ये दरवर्षी धुम्रपानाच्या तुलनेत पोटाच्या कर्करोगाची 1900 प्रकरणं समोर येतात. लोकांचं वाढत वजन यासाठी कारणीभूत आहे. लठ्ठपणामुळे मूत्रपिंडाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि यकृताचा कर्करोग यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

लठ्ठपणामुळे कर्करोग कसा होतो?

आपल्या शरिरात अनावश्यक चरबी जमा होते, त्यामुळे लठ्ठपणा वाढतो. शरिरातील अनावश्यक चरबी मेंदूला एक सिग्नल पाठवते की, त्याला शरिरातील सेल्सना लवकरात लवकर आणि अधिक प्रमाणात विभाजित करण्याची गरज आहे. यामुळे आपल्या शरिरातील सेल्सना नुकसान पोहोचतं आणि कर्करोग होण्याचा धोका उद्भवतो. त्यामुळे लठ्ठपणामुळे कर्करोग होऊ शकतो, याबाबत अधिक जागरुकता पसरवण्याची गरज आहे.

‘धुम्रपान कमी होत असला, तरी लठ्ठपणा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. याचा थेट परिणाम हा राष्ट्रीय आरोग्य संकटावर होत आहे. येणारी पिढी ही भलेही स्मोक-फ्री वातावरणात राहिल. मात्र, जर लहानपणापासूनच ते लठ्ठपणाच्या जाळ्यात अडकले, तर त्यांचं भविष्य धोक्यात असेल’, असं या अभ्यासाचे प्रमुख संशोधक मिशेल यांनी सांगितलं.

लठ्ठपणामुळे एक-दोन नाही तर 13 प्रकारचे कर्करोग होऊ शकतात, हे वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्याबाबत जागतिक स्तरावर जनजागृती करण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

वजन कमी करण्यासाठी किती ग्रीन टी प्यायला हवी?

नवरोबाही बायकांना लहान मुलांएवढाच त्रास देतात : सर्व्हे

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज नारळ पाणी प्या, व्यायाम न करता 10 किलो वजन घटणार, पाहा कसं?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *