Tea Habits | चहा पिताना होणाऱ्या ‘या’ चुका टाळा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

Tea Habits | चहा पिताना होणाऱ्या ‘या’ चुका टाळा, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान!

आपण चहा पिताना अशा अनेक चुका वारंवार करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहचण्याची शक्यता असते.

Harshada Bhirvandekar

|

Jan 20, 2021 | 10:28 AM

मुंबई : थंडीच्या दिवसांत बऱ्याच लोकांना गरमागरम चहा पिणे आवडते. काही लोकांना ‘बेड टी’ची सवय असते, तर अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी चहा पिण्याची सवय असते. ऋतू किंवा हंगाम कोणताही असो, चहा हा प्रत्येकाच्या घरात नेहमीच असतो. काही लोकांना थोडासा कंटाळा आला तरी चहा पिण्याची इच्छा होते. डोकेदुखी असो किंवा भूक शमवण्याची इच्छा, लोक चहा प्यायला पहिले प्राधान्य देतात (Tea Habits keep these things in mind while drinking tea).

अनेक लोक घरी आणि ऑफिसमध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत चहाचे अनेक कप रिचवतात. हे व्यसन त्यांच्यासाठी एक जाळे बनते. कारण, आपण चहा पिताना अशा अनेक चुका वारंवार करतो, ज्यामुळे आपल्या आरोग्यास हानी पोहचण्याची शक्यता असते. अशा प्रकारच्या चुका करून लोक नकळत त्यांच्या आरोग्यास हानी पोचवतात. चहाची सवय असो वा तलफ, तिचे सेवन करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या तर आपण परिपूर्ण जीवन जगू शकाल.

रिकाम्या पोटी चहा पिण्याची चूक करू नका.

आपल्यापैकी अनेक लोक सकाळी उठतात आणि रिकाम्या पोटी चहा पितात. ही सवय बहुतेकांना असते. परंतु सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. असे केल्याने आपल्याला अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. तसेच कर्करोगाचा धोकाही वाढू शकतो. म्हणून, सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास पाणी प्या आणि त्यानंतरच चहा घ्या (Tea Habits keep these things in mind while drinking tea).

खाल्ल्यानंतर लगेच चहा पिऊ नका.

बर्‍याच लोकांना अशी सवय असते की, त्यांना खाल्ल्यानंतर लगेच चहा पिणे आवडते. परंतु यामुळे केवळ आपल्या आरोग्यास हानी पोहचते. वास्तविक, आणणा ग्रहण केल्यानंतर त्यातून शरीराला मिळणारे पोषक घटक लगेच चहा प्यायल्याने शोषल जात नाही, ज्यामुळे बर्‍याच समस्या उद्भवू शकतात. म्हणून खाण्याच्या किमान एक तासानंतर चहा प्या.

झोपण्याच्या आधी अजिबात चहा पिऊ नका.

झोपण्यापूर्वी एक कप चहा पिण्याची सवय अनेकांना असते. परंतु, ही सवय आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. वास्तविक, चहाच्या पानांमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. झोपण्यापूर्वी चहा प्यायल्याने आपल्याला झोपेच्या समस्या उद्भवू शकतात.

चहा जास्त उकळू नये.

चहा बनवत असताना तो खूप वेळ उकळला जातो. जास्त प्रमाणात उकळल्याने चहा खूप चांगला बनतो असे बऱ्याच लोकांना वाटते. परंतु, असे अजिबात नाही. चहा जास्त वेळ उकळवू नये. यामुळे अ‍ॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते.

(Tea Habits keep these things in mind while drinking tea)

हेही वाचा :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें