Study | टक्कल पडण्याची समस्या लवकरच नाहीशी होणार! वाचा काय म्हणतोय संशोधकांचा नवा अभ्यास…

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Jan 30, 2021 | 3:49 PM

आजकाल खूपच लहान वयात अनेकांना केस गळतीची समस्या सुरु होते आणि टक्कल पडत आहे.

Study | टक्कल पडण्याची समस्या लवकरच नाहीशी होणार! वाचा काय म्हणतोय संशोधकांचा नवा अभ्यास...
आजकाल खूपच लहान वयात अनेकांना केस गळतीची समस्या सुरु होते आणि टक्कल पडत आहे.

मुंबई : धावपळीच्या या युगात दिवसेंदिवस लोकांची जीवनशैली बदलत आहे. ज्यामुळे, टक्कल पडण्याची समस्या ही अगदी सामान्य झाली आहे. आजकाल खूपच लहान वयात अनेकांना केस गळतीची समस्या सुरु होते आणि टक्कल पडत आहे. याचबरोबर लोकांना केसांच्या अनेक समस्या देखील भेडसावत आहेत. टक्कल पडण्याची समस्या हा आता जागतिक स्तरावर लोकांवर परिणाम करत आहे (Thailand university research study on hair loss bald head problem).

अलीकडे, थायलंडमधील संशोधकांनी त्यांच्या नव्या संशोधनात असा दावा केला आहे की, टक्कल पडण्याच्या समस्येवर प्रभावी असा उपचार आता उपलब्ध आहे. त्यांच्या या संशोधनाच्या निष्कर्षावर संशोधकांनी असा दावा केला आहे की, खारफुटीची अर्थात मॅंग्रोव्हच्या झाडाच्या अर्काचा वापर करून ही समस्या दूर केली जाऊ शकते. या अर्काला Avicequinon C असे म्हटले जाते. हा अर्का आपल्या केस गळती होण्यास कारणीभूत असणाऱ्या हार्मोन्सला प्रतिबंधित करतो.

थायलंडच्या संशोधकांचा दावा

थायलंडच्या Chulalongkorn विद्यापीठातील संशोधकांनी नुकतेच एक संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनात 50 पुरुष आणि महिलांचा समावेश होता. संशोधनात असे दिसून आले आहे की सर्व लोक एंड्रोजेनिक अलोपिसीयाने पीडित होते. ही केस गळतीची सर्वात सामान्य समस्या आहे. या अर्क उपचारानंतर, केवळ या लोकांमध्ये केस गळणे कमी झाले नाही, तर त्यांचे केस देखील खूप मजबूत झाले. या संशोधनानुसार, टक्कल पडलेल्या लोकांसाठी देखील हे औषध प्रभावी ठरणार आहे (Thailand university research study on hair loss bald head problem).

या संशोधनाशी संबंधित एका प्राध्यापकाने असा दावा केला की, आम्ही त्यांच्या डोक्याच्या प्रत्येक भागाची छायाचित्रे काढली आहेत. तसेच, केस गळती झालेल्या भागाचे फोटो देखील घेण्यात आले होते. आम्ही 4 महिन्यांनंतर या प्रक्रियेची पुनरावृत्ती केली. लोकांनी त्यांचा टक्कल पडलेला भाग तपासून पाहिला आणि केवळ एक महिन्यानंतर केसांच्या वाढीत बरेच सकारात्मक बदल झालेले दिसून आले. या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस कुठल्याही प्रकारची समस्या आली नव्हती.

6 महिन्यांत उत्पादन बाजारात येण्याची शक्यता

असे सांगितले जात आहे की आता ही चाचणी करण्यासाठी अधिकाधिक लोकांनावर याचे संशोधना करण्यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. याच्या निकालानंतरच थायलंडच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडून या उत्पादनाला मंजुरी मिळेल. एका खासगी कंपनीने या संशोधनासाठीचे पेटंट आधीच विकत घेतले आहे आणि या पेटंटच्या मदतीने ही कंपनी केस गळतीचे उत्पादन तयार करू शकते. असा विश्वास आहे की, हे उत्पादन पुढील 6 महिन्यांत बाजारात येऊ शकते.

(टीप : सदर माहिती संशोधनावर आधारित असून, याच्याशी वेबसाईट सहमत असेलच असे नाही.)

(Thailand university research study on hair loss bald head problem)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI