Indian Railway | रेल्वेच्या डब्यांवरील क्रमांकाचा नेमका अर्थ काय? कोचबद्दल खूप काही माहिती देतील ‘हे’ आकडे…

गावी जाताना, अथवा बाहेर कुठे जात असताना ट्रेनच्या डब्यावर लिहिलेले चार, पाच आणि सहा आकडी क्रमांक कधी आपल्या लक्षात आले आहेत का?

Indian Railway | रेल्वेच्या डब्यांवरील क्रमांकाचा नेमका अर्थ काय? कोचबद्दल खूप काही माहिती देतील ‘हे’ आकडे...

मुंबई : भारतीय रेल्वेला देशाची ‘लाईफलाईन’ म्हणतात. आपण सर्वजण ट्रेनमधून प्रवास करतो. आपापल्या सोयीनुसार ट्रेनमध्ये सीटही बुक करतो. परंतु, नेहमी प्रवास करुनही आपल्याला भारतीय रेल्वेशी संबंधित काही गोष्टींबद्दल माहिती नाही. गावी जाताना, अथवा बाहेर कुठे जात असताना ट्रेनच्या डब्यावर लिहिलेले चार, पाच आणि सहा आकडी क्रमांक (Numbers on train coach) कधी आपल्या लक्षात आले आहेत का? (The Numbers written on train coach tells so much about that coach)

या आकड्यांपुढे लिहिलेले ट्रेनचे नाव वाचून आपण सहज पुढे निघून जातो. परंतु, आपण कधी त्या नंबरबद्दल विचार केला आहे का? ते का लिहिले असावेत आणि त्यांचा नेमका अर्थ काय आहे?, हे आपण कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणून आम्ही तुमच्यासाठी ‘या’ आकड्यांची माहिती घेऊन आलो आहोत.

‘हे’ आकडे सांगतात बरेच काही….

ट्रेनच्या प्रत्येक डब्यावर प्रामुख्याने पाच अंकी क्रमांक लिहिलेला असतो. याचे भिन्न भिन्न अर्थ आहेत. या क्रमांकातील पहिले दोन आकडे तो डबा कोणत्या वर्षात बनला आहे, हे सूचित करतात. जसे की, एखाद्या कोचवर 92322 लिहिलेले आहे. तर पहिल्या दोन आकड्यांनुसार हा कोच सन 1992मध्ये बनविण्यात आला आहे. जर कोचचा क्रमांक 0123 असेल तर, त्याचे पहिले दोन अंक दर्शवितात की, 2001मध्ये हा कोच तयार झाला आहे. आता ही झाली पहिल्या दोन आकड्यांची कथा, चला उर्वरित तीन संख्यांबद्दल देखील जाणून घेऊ (The Numbers written on train coach tells so much about that coach).

कोचवरील क्रमांकातील उर्वरित तीन आकडे, तो कोच एसी 1 टियर किंवा 2 टियर किंवा सामान्य द्वितीय श्रेणीतला आहे, हे दर्शवतात. जसे की, कोचवर 92322 लिहिलेले आहे. तर, तुम्हाला पहिल्या दोन अंकांचा अर्थ समजला आहे, उर्वरित तीन संख्या कोच कोणत्या श्रेणीतील आहेत हे सांगतात. उदाहरणार्थ, 322 या आकड्यांवरून कळते की, हा द्वितीय श्रेणीचा स्लीपर कोच आहे. अशा प्रकारे, विशिष्ट माहितीसाठी हे अंक रेल्वे कोचवर लिहिलेले असतात. यासाठी वेगवेगळ्या क्रमांकाचे वितरणही करण्यात आले आहे. (The Numbers written on train coach tells so much about that coach)

असा आहे शेवटच्या तीन आकड्यांचे अर्थ…

-001-025 – एसी प्रथम वर्ग (AC First Class)

-026-050 – संमिश्र 1 एसी + एसी -2 स्तर (Composite 1AC + AC 2 T)

-051-100 – एसी -2 टियर (AC 2 T)

-101-150 – एसी -3 टियर (AC 3 T)

-151-200 – सीसी-एसी चेअर कार

-201400 – एसएल (द्वितीय श्रेणी स्लीपर) SL (2ND Class Sleeper)

-401-600 – सामान्य द्वितीय श्रेणी

-601-700 – द्वितीय श्रेणी सिटींग / जन शताब्दी चेअर कार

-701-800 – एसएलआर- मालवाहू कोच

-801+ – पॅन्ट्री कार, व्हीपीयू, मेल कोच, जनरेटर कार इ.

(The Numbers written on train coach tells so much about that coach)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI