AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tourism: लेह-लडाखमध्ये आहेत ‘ही’ अद्भूत ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या

लेह-लडाख हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. लोक अनेकदा तिथे बाइक राईड करण्यासाठी जात असतात. पण लडाख केवळ बाईक राईडसाठीच नाही तर तेथे अशी काही ठिकाणं आहेत जे पाहण्यासारखी आहेत. चला तर मग आजच्या लेखात लडाखची काही ठिकाणं जाणून घेऊयात...

Tourism: लेह-लडाखमध्ये आहेत 'ही' अद्भूत ठिकाणं, एकदा नक्की भेट द्या
Pangong
| Edited By: | Updated on: Sep 26, 2025 | 10:31 PM
Share

लेह-लडाख हे खरोखरच एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. जेव्हा लडाखचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात आधी मनात येते ती म्हणजे बाईक राईड. उंच पर्वत, शांत रस्ते आणि परिसर एक उत्तम अनुभव देतात. बाईक प्रेमींना किमान एकदा तरी लेह-लडाखला भेट द्यायची इच्छा असते. पण लडाख फक्त बाईक राईडसाठीच नाही तर तेथे एक्सप्लोर करण्यासाठी बरीच ठिकाणं आहे.

लडाख हे साहस, संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याचे मिश्रण आहे. येथे खडकाळ ट्रेकिंग आणि असंख्य ॲडव्हेंचर खेळ आहेत. तुम्ही निसर्गप्रेमी असाल, फोटोग्राफीचं आवड असेल किंवा फक्त शांततेत वेळ घालवायचा असेल तर लेह-लडाखमध्ये सर्वकाही आहे. या लेखात लेहमधील काही अशी सुंदर लपलेली ठिकाणं आहेत जे अजून जास्त लोकांना माहित नाही, चला तर मग जाणून घेऊयात.

तुर्तुकला नक्की भेट द्या

तुर्तुक हे लेह, लडाख येथील एक सुंदर आणि लपलेले ठिकाण आहे. हे छोटेसे गाव समुद्रसपाटीपासून 9000 फूट उंचीवर आहे. या उंचीवरून तुम्ही निसर्गाचे आणि तेथील ठिकाणांचे हे एक अद्भूत दृश्य पाहतच राहाल. असेही म्हटले जाते की हे गाव सियाचीन ग्लेशियरच्या प्रवेशद्वारांपैकी एक आहे. येथे भेट दिल्याने खरोखरच एक अनोखा अनुभव मिळेल.

हानले, सर्वात सुंदर गाव

हानले गाव त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते. हानलेला भेट देणे हे स्वप्न पूर्ण करण्यासारखे आहे. बर्फाच्छादित पर्वत, आकाशात चमकणारे तारे हे मनमोहक संपूर्ण दृश्ये तुम्ही पाहतच बसाल. म्हणूनच ते भारतातील सर्वात सुंदर गावांपैकी एक म्हणून ओळखले जाते. जगातील सर्वात उंच मठ पाहण्याचा हानलेला भेट देणे हा एक उत्तम मार्ग आहे.

पँगाँग तलावाचे दृश्य

भारत आणि चीनच्या सीमेवर वसलेले, पँगाँग सरोवर त्याच्या बदलत्या रंगांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. ते 134 किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. तुम्हाला दिवसभरात वेगवेगळ्या वेळी या सरोवराचे पाण्याचा वेगवेगळा रंग पाहायाला मिळतील. निळे पाणी आणि बर्फाच्छादित डोंगर हे एक अद्भूत दृश्य पाहणे खरच खूप छान वाटते. सरोवराच्या सौंदर्याचे कौतुक करण्यासोबतच, तुम्ही येथे कॅम्पिंग आणि फोटोग्राफीचा आनंद देखील घेऊ शकता.

झंस्कर व्हॅली हा देखील एक चांगला पर्याय

बाईक राईड व्यतिरिक्त तुम्ही लडाखमध्ये राफ्टिंगचा आनंद देखील घेऊ शकता. यासाठी सर्वोत्तम ठिकाण म्हणजे झंस्कर व्हॅली. तुम्ही येथे राफ्टिंगचा आनंद घेऊ शकता, तलावाचे स्फटिकासारखे स्वच्छ पाणी आणि सुंदर दऱ्या हे निसर्ग सौंदर्य पाहतच बसाल. तुम्ही येथील थुकपा, मोमोज आणि तिबेटी ब्रेड या स्थानिक पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता.

खारदुंगाला येथे ट्रेकिंग

खारदुंगाला हे सर्वोत्तम पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे नुब्रा आणि श्योक खोऱ्यांचे अंतिम प्रवेशद्वार आहे. येथे तुम्ही अनेक ॲडव्हेंचर उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. खारदुंगा ला हे अवश्य भेट देण्यासारखे ठिकाण आहे. पण या ठिकाणी तुम्हाला खाण्यासाठी काहीही मिळणार नाही. म्हणून, हायकिंग करताना तुमच्यासोबत अन्न आणि पेये सोबत ठेवा.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.