पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

मुंबई : सध्याच्या आधुनिक जीवनात आपला जास्तीत जास्त वेळ हा ऑफिसमध्ये कॉम्प्युटर काम करण्यात जातो. दिवसातील 8-9 तास ऑफिसमध्ये कुठल्याही शारिरीक हालचालीशिवाय खुर्चीवर बसून आपण काम करत असतो. यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ लागतो. आपल्या पोटाचा घेर वाढू लागतो. मग तुम्ही कितीही व्यायाम किंवा जिम करत असाल, मॉर्निंग वॉक करत असाल, तरीही हा पोटाचा घेर …

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

मुंबई : सध्याच्या आधुनिक जीवनात आपला जास्तीत जास्त वेळ हा ऑफिसमध्ये कॉम्प्युटर काम करण्यात जातो. दिवसातील 8-9 तास ऑफिसमध्ये कुठल्याही शारिरीक हालचालीशिवाय खुर्चीवर बसून आपण काम करत असतो. यामुळे आपल्या शरीरावर परिणाम होऊ लागतो. आपल्या पोटाचा घेर वाढू लागतो. मग तुम्ही कितीही व्यायाम किंवा जिम करत असाल, मॉर्निंग वॉक करत असाल, तरीही हा पोटाचा घेर काही आटोक्यात येत नाही. त्यामुळे आपल्याला तणाव जाणवू लागतो. सध्याच्या कामाऐवढंच चांगल दिसण्यालाही महत्त्व दिलं जातं. त्यामुळे नोकरी करणाऱ्या अनेक जणांना वाढलेल्या पोटामुळे त्रास होऊ लागतो.

व्यायाम केल्यानंतरही हे पोट आत का जात नाही, असा प्रश्न अनेकांना पडतो. पोट कमी करण्यासाठी केवळ व्यायाम करणेच नाही, तर चांगला आहार घेणेही आवश्यक आहे. एका संशोधनानुसार, हेल्दी फॅट, हेल्दी प्रोटीन आणि हेल्दी कार्बोहायड्रेट युक्त आहार तुमच्या पोटाचा घेर कमी करण्यात मदत करतात.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात कुठल्या पदार्थांचा समावेश कराल

बदाम :

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

दररोज 8 ते 10 बदाम खाव्या. याने शरिराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसेच सॅलड आणि फ्रूट चाटसोबत बदामचं सेवन केल्याने तुमच्या पोटावरील चरबी लवकर कमी होण्यास मदत होईल. त्याशिवाय बदाम हे अनेक हृदयासंबंधी आजारांशी लढण्यात मदत करते.

हिरव्या भाज्या :

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

हिरव्या भाज्या या शरिरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरी नियमित प्रमाणात असल्याने शरिरातील फॅट नियंत्रणात राहातं. हिरव्या भाज्यांमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं. हे आपल्या पचन क्रियेला नियमित ठेवण्यात मदत करतं. पचन क्रिया व्यवस्थित असल्याने पोट सुटण्याच्या समस्या उद्भवत नाही.

अंडी :

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

स्नायूंच्या मजबूतीसाठी आणि शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी अंडी आहारात नियमितपणे घ्या. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल किंवा पोटाचा घेर कमी करायचा असेल तर नेहमी अंड्याच्या पांढऱ्या भागाचे सेवन करा. कधीही अंड्याच्या आतला पिवळा भाग खाऊ नका. अंडींमध्ये आवश्यक प्रमाणात प्रोटीन असतं. हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं, त्यामुळे वजन नियंत्रित राहाण्यास मदत होते.

पीनट बटर :

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

वजन कमी करायचं असेल तर आहारात साध्या बटर ऐवजी पीनट बटरचा समावेश करा. यामध्ये लो कोलेस्ट्रॉल असल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहाते. जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल, तर सध्या बटर ऐवजी पीनट बटरचा वापर करण्यास सुरुवात करा.

प्रोटीन :

How to burn fat, पोटाचा घेर कमी करण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

स्नायूंच्या विकासासाठी शरीराला आवश्यक त्या प्रमाणात प्रोटीनची गरज असते. शरीराला प्रोटीन मिळणे अत्यंत आवश्यक असतं. प्रोटीनच्या कमतरतेने पोट सुटू लागतं. तसेच यामुळे तुम्हाला अशक्तपणाही जाणवू शकतो. त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश नक्की करा.

नोट : वर दिलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *