AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोजच्या वापरातल्या या 10 पदार्थांची एक्सपायरी डेट तुम्हाला माहितीये का?

पॅकिंग केलेल्या पदार्थांची एक्सपायरी डेट त्यावर लिहिलेली असते. पण मसाले आणि तांदूळ यासारख्या अनेक गोष्टी बाजारात आपल्याला पॅकिंग न केलेल्या मिळतात. लोकांना वाटते की ते बराच काळ साठवता येतात. पण असं नाहीये, एका विशिष्ट वेळी या गोष्टी खराब होतात.

रोजच्या वापरातल्या या 10 पदार्थांची एक्सपायरी डेट तुम्हाला माहितीये का?
expiry date
| Edited By: | Updated on: May 14, 2025 | 11:35 PM
Share

आपल्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या वस्तू बाजारात सहज उपलब्ध असतात. तसेच काही पदार्थ व वस्तू बराच काळ टिकावे यासाठी त्यावर प्रक्रिया करून ते पॅक केले जातात. तर या पॅकेज्ड फूडबद्दल बरीच माहिती दिली जाते. हे पदार्थ बनवण्यासाठी कोणते घटक वापरले गेले आहेत आणि त्यात असलेले पोषक घटक, तसेच ती वस्तू किती काळ वापरली जाऊ शकते, ज्याला एक्सपायरी डेट म्हणतात. या सगळयाची माहिती आपल्याला वस्तूच्या पॅकेटवर दिलेली असते. याव्यतिरिक्त आपल्याला बाजारात व दूकानांमध्ये अशा काही वस्तू मिळतात ज्या कधीच पॅक केलेल्या नसतात, आणि आपण त्या पदार्थांचे व वस्तूची खरेदी करतो. पण या पॅक न केलेल्या स्वरूपात उपलब्ध असलेल्या गोष्टी देखील मर्यादित काळासाठी वापरल्या जातात.

बाजारात असे अनेक अन्नपदार्थ उपलब्ध आहेत, जे खरेदी केल्यानंतर लोकं बराच काळ वापरत नाहीत. कदाचित लोकांना त्याची एक्सपायरी डेट माहित नसल्यामुळे आणि त्यांना वाटते की त्या गोष्टी दीर्घकाळ वापरता येतील. पण ते तसं नाहीये. प्रत्येक गोष्टीची एक एक्सपायरी डेट असते. तर आजच्या लेखात आपण अशा 10 गोष्टींबद्दल जाणून घेऊया.

पीठ

लोकांचा असा विश्वास आहे की पीठ जास्त काळ टिकवून ठेवता येते. पण ते तसं नाहीये. 6 ते 8 महिन्यांपर्यंत वापरता येते. पण धान्यातील आवश्यक तेले असल्यामुळे गव्हाचे पीठ लवकर खराब होते. जर त्याला विचित्र वास येत असेल किंवा त्याच्या चवीत बदल होत असेल तर ते फेकून द्यावे. याशिवाय, पिठाचे पॅकेट फेकून देण्यापूर्वी, त्यावर लिहिलेली एक्सपायरी डेट तपासणे आवश्यक आहे.

मॅपल सिरप

पॅनकेक्स, वॅफल्स आणि फ्रेंच टोस्ट सारख्या गोष्टी बनवण्यासाठी मेपल सिरपचा वापर केला जातो. याशिवाय, ते बेकिंग किंवा स्वयंपाकासाठी देखील वापरले जाते. पण मॅपल सिरप एका भांड्यात भरून बराच काळ साठवले जाते. यासाठी एकदा या डब्याचे झाकण उघडले की ते सुमारे दोन वर्षांत खराब होऊ शकते. खराब झाल्यावर ते बुरशीसारखे होऊ शकते. तर हे सिरप साठवण्यासाठी एका घट्ट बॉक्समध्ये बंद करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

फ्रोझन फूड

आजकाल बाजारात फ्रोझन फूड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. ते रेफ्रिजरेटरमध्ये बराच काळ ठेवलेले असते आणि तुम्हाला हवे तेव्हा तयार करता येते. यामध्ये भाज्या, फळे, तयार अन्न आणि मांस यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. गोठवलेल्या भाज्यांच्या पिशव्या रेफ्रिजरेटरमध्ये महिनोनमहिने ठेवता येतात, परंतु खरेदी केल्यानंतर काही आठवड्यांतच हे पदार्थ खा. त्यावर एक्सपायरी डेट लिहिलेली असते, पण काही दिवसांनी ते खाल्ल्याने त्याची चव खराब होऊ शकते.

कॅनोला तेल

कॅनोला तेल जर योग्यरित्या साठवले तर ते एक वर्षापर्यंत साठवता येते. पण जर ते योग्यरित्या साठवले नाही तर ते त्याआधीच खराब होऊ शकते. ते स्टोव्हपासून दूर थंड, कोरड्या जागी ठेवा, कारण गरम वातावरणामुळे तेलाची चव आणि सुगंध दोन्ही कमी होऊ शकतात.

बेकिंग पावडर

लोकांचा असा विश्वास आहे की मीठ आणि बेकिंग पावडर बराच काळ साठवता येते. बेकिंग पावडर सुमारे एक वर्षानंतर त्याची बेकिंग करण्याची क्षमता संपते. 1/2 कप गरम पाण्यात एक चमचा बेकिंग पावडर मिसळा. जर ते उकळत असेल तर ते बरोबर आहे, जर नसेल तर तुम्ही ते वापरू नये.

सुके मसाले

मसाल्यांचे शेल्फ लाइफ ते दळलेले आहेत की संपूर्ण आहेत यावर अवलंबून असते. हिरवे मसाले आणि हर्बस जसे की ओवा एक वर्षानंतर त्याची चव कमी होतो. तर दर दोन वर्षांनी बारीक केलेले मसाले आणि दर तीन ते चार वर्षांनी कडधान्य आणि मिरपूड पुन्हा खरेदी करावीत.

केचप

केचपची एक्सपायरी डेट त्याच्या पॅकेटवर लिहिलेली असते. पण उघडल्यानंतर सुमारे चार ते सहा महिन्यांनी त्याची गुणवत्ता खालावू लागते. म्हणून उघडलेल्या केचपची चव टिकवून ठेवण्यासाठी, ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि बाटली किंवा पॅकेटवर नमूद केलेल्या एक्सपायरी डेटनंतर ते फेकून द्या.

पीनट बटर

आजकाल लोकांना पीनट बटर खूप खायला आवडते. नैसर्गिक पीनट बटर सर्वोत्तम आहे. पण त्याचा बॉक्स किंवा पॅकेट उघडल्यानंतर, तीन महिन्यांनंतर त्याच्या चवीत फरक दिसून येऊ शकतो. याशिवाय, ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून सहा महिने ताजे ठेवता येते.

लोणचे

आपल्यापैकी अनेकांना जेवताना लोणचं लागतच. पण एक वर्षानंतर लोणच्याच्या चवीत फरक जाणवू शकतो. ते साठवण्याच्या योग्य पद्धतीने साठवता येते. कारण तेलाच्या कमतरतेमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते बुरशीसारखे होऊ शकते. ज्यामुळे लोणच्यावर पांढरा किंवा जाड थर येऊ शकतो.

तादूंळ

तांदूळ हे 40° फॅरेनहाइटपेक्षा कमी तापमानात ऑक्सिजनमुक्त वातावरणात साठवता येत नाही. अशातच तूम्ही जर तांदूळ हे हवाबंद डब्यात ठेवले नाही तर ते लवकर खराब होऊ शकतात. यासाठी तांदूळ साठवण्याकरिता ते हवाबंद डब्यात ठेवा. असा पांढरा तांदूळ 1 ते 2 वर्षे टिकू शकतो. तर लाल तांदूळ सहा महिने चांगला राहतो. जर ते मोकळ्या जागेत ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.