AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांचं अभ्यासात मन लागत नाहीये? तर त्यांच्या सकाळच्या नाश्त्यात ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश

मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांना रोज नाश्त्यात पौष्टिक पदार्थ खायला द्या. चला तर मग आजच्या लेखात आपण मुलांना नाश्त्यात कोणते पदार्थ द्यावे ते जाणून घेऊयात.

मुलांचं अभ्यासात मन लागत नाहीये? तर त्यांच्या सकाळच्या नाश्त्यात 'या' 5 गोष्टींचा करा समावेश
शालेय मुलांसाठी अभ्यासाची सर्वात योग्य वेळ कोणती? सविस्तर जाणून घ्याImage Credit source: Freepik
| Edited By: | Updated on: Aug 28, 2025 | 4:26 PM
Share

प्रत्येक पालकांना मुलांच्या शिक्षणाबद्दल खूप काळजी असते. त्यात आजकाल जर मुले अभ्यासात मागे पडत असतील तर त्याचे कारण केवळ त्यांच्या अभ्यासाच्या सवयीच नाही तर आहार आणि जीवनशैली हे देखील एक मोठे कारण आहे. मेंदू सक्रिय आणि तीक्ष्ण ठेवण्यासाठी योग्य पोषण असणे खूप महत्वाचे आहे. त्यात रोजच्या या घाईगडबडीत मुलं सकाळी नाश्ता करणे टाळतात किंवा अशा प्रकारचा नाश्ता करतात ज्यामध्ये खूप कमी पोषण असते. तर नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा जेवण मानला जातो. निरोगी आणि संतुलित नाश्ता केवळ ऊर्जा देत नाही तर मेंदूची शक्ती देखील अनेक पटींनी वाढवतो. जर तुम्हाला तुमच्या मुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचे असेल आणि मेंदू तीक्ष्ण व्हावे असे वाटत असेल तर सकाळच्या नाश्त्यात काही खास पदार्थांचा समावेश नक्कीच करा. चला तर मग आजच्या या लेखात आपण मुलांच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा याबद्दल जाणून घेऊयात…

ओट्स किंवा ग्रीन सीरियल्स

ओट्स हे मुलांच्या मेंदूसाठी सर्वोत्तम नाश्ता मानला जातो. कारण यामध्ये असलेले फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मेंदूला सतत ऊर्जा प्रदान करतात. मुले शाळेत जातात तेव्हा त्यांना बराच काळ सक्रिय राहावे लागते, अशावेळेस ओट्स किंवा ग्रीन सीरियल्स असा नाश्ता करण्यास द्यावा. अशाने त्यांना लक्ष केंद्रित करण्यास आणि सतर्क राहण्यास मदत होते. तुम्ही त्यात दूध, मध आणि ड्रायफ्रुट्स घालून ते अधिक पौष्टिक बनवू शकता.

अंडी

अंडयामध्ये प्रथिने आणि कोलीन भरपूर प्रमाणात असते जे मेंदूच्या पेशींना बळकटी देते. कोलीन विशेषतः स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यास मदत करते. जर तुमची मूलं अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नसेल, तर त्यांना नाश्त्यात उकडलेले अंडे, ऑम्लेट किंवा अंड्याचे सँडविच बनवून खायला देणे खूप फायदेशीर ठरेल. यामुळे केवळ शारीरिक शक्तीच वाढत नाही तर मानसिक विकासातही मदत होते.

नट्स आणि सीड्स

बदाम, अक्रोड, चिया बिया आणि अळशीच्या बिया हे मेंदूसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. त्यात असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे मेंदूचे कार्य सुधारतात. दररोज सकाळी नाश्त्यात मुलांना मूठभर ड्रायफ्रूट्स आणि बिया दिल्याने त्याची स्मरणशक्ती आणि शिकण्याची कौशल्ये मोठ्या प्रमाणात वाढतात.

दही आणि फळे

दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स आणि प्रथिने मेंदूला थंडावा आणि ऊर्जा दोन्ही देतात. हंगामी फळांसोबत दही मिक्स करून खाल्ल्यास ते मेंदूला एक पॉवरफूल बूस्टर बनते. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि केळी यांसारखी फळे अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असतात जी मेंदूच्या पेशींना नुकसान होण्यापासून वाचवतात आणि मुलाला सक्रिय ठेवतात.

दूध आणि स्मूदीज

दूध हे मुलांसाठी एक संपूर्ण आहार आहे. त्यात असलेले कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि प्रथिने केवळ शरीराला बळकटी देतातच, शिवाय मेंदूच्या विकासातही मदत करतात. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मुलांना दुधासोबत स्मूदीज देखील देऊ शकता. त्यात पीनट बटर, केळी किंवा बेरी टाकून एक चविष्ट आणि आरोग्यदायी पेय तयार करता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!
महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
Mahayuti Meeting Update : महायुतीतील तणावानंतर तिन्ही प्रमुख नेत्यांची 1- 2 दिवसांत बैठक
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर...
5 पैकी 3 जागांवर महाविकास आघाडीचा विजय, शरद पवारांच्या भेटीनंतर हर्षदा देशमुख-जाधव यांचे मोठे विधान
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला...
भाजपच्या कार्यकर्त्यांना त्यांचा अति आत्मविश्वास नडला... ज्येष्ठ नेत्याचं सुचक विधान
महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा...
Ravindra Dhangekar vs Navnath Ban : महायुतीला सूज आलीय, ऑपरेशनची गरज; धंगेकरांच्या विधानावरून बन यांचा पलटवार
महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...
Sanjay Raut on MLC Election Results 2026 : महायुतीला आत्मचिंतन करावं लागणार, कारण...