
थंडीच्या दिवसात स्वच्छ, निरोगी आणि चमकदार चेहरा असावा ही आजकाल प्रत्येकाची इच्छा आहे. पण बाहेरील वातावरण, प्रदुषण तसेच अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी आणि ताणतणाव यांचा आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होतो. म्हणूनच आपल्यापैकी बरेच जण बाजारातून “नैसर्गिक” असे लेबल असलेली महागडे सीरम, क्रीम आणि असंख्य स्किन केअर प्रोडक्ट खरेदी करतात. त्यातच अनेकजणांना असे वाटतं की जर बॉक्सवर “नैसर्गिक” लिहिले असेल तर ते खरंच नैसर्गिक घटकांनी तयार केलेलं आहे, पण नेहमीच तसं होत असं नाही. कारण काही बनावट प्रोडक्टचा खेळ आजकाल इतका व्यापक झाला आहे की कोणत्याही पॅकेजिंगवरील शब्द खरे असतील हे सांगता येत नाही.
कधीकधी हे प्रोडक्ट इतकं भेसळयुक्त असतात की फायदे होण्याऐवजी ते नुकसान देखील करू शकतात. विशेष म्हणजे जोपर्यंत आपण ती आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी बनवलेली पाहत नाही तोपर्यंत त्यात खरोखर नैसर्गिक घटक आहेत की नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. पण तुम्ही अशा काही साध्या घरगुती घटकांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने नाईट सीरम बनवू शकता. हा नाईट सीरम लावल्याने काही दिवसांतच तुमचा चेहरा चमकदार दिसेल. चला तर मग या सोप्या उपायाबद्दल जाणून घेऊयात.
नैसर्गिक नाईट सीरम घरच्या घरी कसा बनवायचा?
लोकांना अनेकदा असे वाटते की नैसर्गिक घटक फक्त बाजारातच उपलब्ध आहेत, परंतु नैसर्गिक घटक घरी सहज उपलब्ध असतात. त्यातच *@letshaveglowgurll या अकाउंटवरून इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या नाईट सीरमने लोकांचे लक्ष वेधले आहे. यात अनेक घरांमध्ये आधीच असलेल्या घटकांचा वापर केला आहे. चला तर या सीरम बद्दल त्याचे फायदे व बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.
नाईट सीरम बनवण्यासाठी फक्त खालील घटकांची आवश्यकता
कोरफड जेल
बीटाचा रस
गुलाब पाणी
ग्लिसरीन
(तुम्ही तुमच्या गरजा आणि त्वचेच्या प्रकारानुसार घटकांचे प्रमाण समायोजित करू शकता).
कसे बनवायचे:
एक स्वच्छ वाटी घ्या. त्यात एक चमचा कोरफड जेल घ्या. आता त्यात थोडासा बीटाचा रस टाका त्यानंतर गुलाबपाण्याचे काही थेंब टाका आणि शेवटी थोडेसे ग्लिसरीन टाकून हे सर्व घटक एकजीव करण्यासाठी मिश्रण गुळगुळीत होई पर्यंत नीट मिक्स करा. तुमचा घरगुती नाईट सीरम तयार आहे. झोपण्यापूर्वी ते तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हलक्या हाताने लावा. ते रात्रभर तुमच्या त्वचेवर काम करेल आणि सकाळी तुम्हाला ताजेतवाने वाटेल.
या घरगुती सीरमचे फायदे
बीट त्वचेला नैसर्गिक गुलाबी रंग देते.
कोरफड त्वचेची जळजळ, डाग आणि मुरुमांचे डाग हलके करते.
गुलाबपाणी चेहरा ताजेतवाने करते.
ग्लिसरीन रात्रभर त्वचा मऊ ठेवते.
या सीरमचा नियमित वापर केल्याने चेहरा स्वच्छ, मऊ आणि तेजस्वी दिसायला लागते
या गोष्टी लक्षात ठेवा:
जर तुमच्या त्वचेवर सहज जळजळ होत असेल, तर प्रथम पॅच टेस्ट करा.
तुम्ही हे सीरम रेफ्रिजरेटरमध्ये ठेवू शकता आणि 5 ते 7 दिवस वापरू शकता.
सकाळी बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका.
सर्वोत्तम परिणामांसाठी, तयार घरगुती सीरम 7 ते 10 दिवस लावा.
डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.