‘ही’ आहेत भारतातील सर्वात शांत आणि कमी गर्दीचे हिल स्टेशन्स
आपल्या भारतात शिमला-मनाली हे ठिकाण पर्यटकांनी इतकी भरलेली असतात की तिथेही शांतता मिळणे कठीण झाले आहे. तर आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी अशी 6 हिल स्टेशन्स घेऊन आलो आहोत, जिथे कमी गर्दी शांततापुर्ण वातावरण असते. चला तर मग जाणून घेऊयात त्या ठिकाणांची नावे...

उन्हाळा संपला की लोकांना पावसाळा कधी सुरू होते असे वाटते. कारण पावसाळ्याच्या दिवसांमध्ये विविध ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जायला अनेकांना आवडते. अशातच लोकांचे बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅन देखील बनतात. त्यातच आपल्याला असं ठिकाण भेटलं पाहिजे जिथे निसर्गसौंदर्य, आल्ल्हाददायक वातावरण तसेच कमी गर्दीचे ठिकाण असावे जेणेकरून ही पिकनिक पुर्णपणे एन्जॉय करता येईल. तुमच्याकडे बजेट आणि वेळ या दोन्हीही गोष्टी असतील तर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा काही ऑफबीट हिल स्टेशनबद्दल सांगणार आहेात जे फार कमी लोकांना माहित आहे. तर तुम्ही या हिल स्टेशन्सवर गेल्यावर निसर्गाचा मनोसोक्त आंनद घेऊ शकाल. चला तर मग जाणून घेऊयता…
शिमलापासून काही अंतरावर असलेले पब्बर व्हॅली हे एक असे ठिकाण आहे जे स्वर्गपेक्षा कमी नाही. येथील अस्पृश्य दऱ्या, सफरचंदाच्या बागा आणि पारंपारिक गावे हे ठिकाण या हिल स्टेशनला खास बनवतात. ट्रेकिंग, मासेमारी आणि निसर्ग प्रेमींसाठी हे एक परिपूर्ण ठिकाण आहे.
प्राशर तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे 2730 मीटर उंचीवर आहे आणि हे ठिकाण त्याच्या रहस्यमय निळ्या तलावासाठी आणि तरंगत्या बेटांसाठी ओळखला जातो. येथील वातावरण खूप शांत आहे आणि येथून धौलाधार पर्वतरांगेचे दृश्य मनमोहक दिसते. या ठिकाणाबद्दल खूप कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे येथे गर्दी कमी असते.
गुशैनी हे तीर्थन व्हॅलीजवळील एक छोटेसे गाव आहे, जे ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यानाजवळ आहे. हे ठिकाण ट्राउंट मासेमारी आणि होमस्टे अनुभवासाठी ओळखले जाते. जर तुम्हाला काही दिवस शांतता आणि निसर्गाच्या सानिध्यात घालवायचे असतील तर गुशैनी हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.
तीर्थन व्हॅली अजूनही गर्दीपासून दूर आहे. येथील जंगल, नद्या आणि डोंगर यांचे एकत्रित दृश्य पाहून तुमचे मन भारावून जाईल इतकं सुंदर ठिकाण आहे. तर अॅडव्हेंचर प्रेमींसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे, येथे तुम्ही ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि रिव्हर क्रॉसिंग करू शकता.
शिमला शहराजवळील चियोग हे एक शांत आणि नैसर्गिक रम्य असे गाव आहे जे त्यांच्या सफरचंद बागा आणि घनदाट जंगलांसाठी ओळखले जाते. या ठिकाणी तुम्हाला अजिबात गर्दी दिसणार नाही. तर हे ठिकाण इतके नयनरम्य आहे की दररोज सकाळी दिवसाची सुरुवात डोंगरावरून येणाऱ्या थंड वाऱ्याने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते. तुम्ही येथे शांततेचे काही क्षण सहज आंनदात घालवू शकता.
चैल हे एक कमी दर्जाचे पण अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे, जिथे जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान देखील आहे. तर या ठिकाणी पाइन जंगले, राजवाडे आणि ट्रेकिंग ट्रेल्स आहेत जे तुम्हाला शांतता आणि रोमांच याचे एक अद्भुत संगम आहे. उन्हाळ्यात भेट देण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. तसेच येथे गर्दी खूपच कमी असते.
