AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान

पपई खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात. आरोग्यासाठी पपई चांगली मानल्या जाते. पण आरोग्याच्या काही समस्या असल्यावर पपईचे सेवन टाळले पाहिजे.

या लोकांनी चुकूनही करू नये पपईचे सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान
| Edited By: | Updated on: Nov 30, 2024 | 4:00 PM
Share

गोड चव आणि पोषक तत्वांमुळे अनेकांना पपई आवडते. त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्वे ए, सी आणि ई असतात. जे त्वचा आणि डोळ्यांसाठी चांगले असतात. याशिवाय यामध्ये फायबर देखील असते जे पचनास मदत करते पण पपई प्रत्येकासाठी फायदेशीर नाही. काही लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पपईचे सेवन करू नये जाणून घेऊया कोणत्या लोकांनी पपई खाणे टाळावे आणि का?

या लोकांनी टाळावे पपईचे सेवन

किडनी स्टोन किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी पपई खाणे टाळावे. पपईमध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो जो किडनी स्टोन तयार करण्यास मदत करतो. जर तुम्हाला आधीच किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर पपई खाल्ल्याने तुमची समस्या वाढू शकते.

गरोदर स्त्रियांनी गरोदरपणात महिलांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्यावी. पपईमध्ये लेटेक्स नावाचा पदार्थ असतो जो गर्भाशयाला संकुचित करू शकतो. यामुळे अकाली प्रसुती किंवा गर्भपात होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी पपई खाणे टाळावे.

त्वचेची समस्या काही लोकांना पपईची एलर्जी असू शकते तुम्हाला खाज सुटणे, लालसरपणा किंवा सूज येणे यासारख्या त्वचेच्या समस्या असल्यास पपई खाण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. पपई खाल्ल्याने तुमच्या त्वचेच्या समस्या वाढू शकतात.

हृदयरोग हृदयरोग असलेल्या रुग्णांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पपई मध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते जे हृदयरोगासाठी हानिकारक ठरू शकते.

मधुमेह मधुमेहाच्या रुग्णांनी पपई खाताना काळजी घ्यावी. पपईमध्ये नैसर्गिक साखर असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

औषध तुम्हाला कुठलाही प्रकारची औषधे सुरू असतील तर पपई खाणे टाळा. पपई खाल्ल्यानंतर औषध घेतल्याने त्याची रिएक्शन होण्याची शक्यता असते.

पपई किती आणि कधी खावी? जर तुम्हाला आरोग्य संबंधित काही समस्या नसेल तर तुम्ही पपई मध्यम प्रमाणात खाऊ शकता पपई नाश्ता किंवा दुपारचे जेवण म्हणून खाऊ शकता. तुम्ही पपईचा रस देखील पिऊ शकता.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा