भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी

हिवाळा सुरू झाला की आपण प्रत्येकजण थंडीचा आनंद घेत असतो. पण आपल्या भारतात अशी काही ठिकाणं आहेत जी थंडीच्या दिवसात तेथील तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. ज्यामुळे तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत होते. चला तर मग भारतात सर्वात जास्त थंडी कोणत्या ठिकाणी पडते ती ठिकाणं जाणून घेऊयात.

भारतातील या ठिकाणी पडते हाडं गोठवणारी थंडी, तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षाही कमी
Cold Weather
Image Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:48 PM

हिवाळा ऋतू सुरू झाला की आपण थंडीचा आनंद घेण्यासाठी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करतो. तर आपल्या भारतात अशी काही ठिकाणं आहेत जिथे हिवाळ्यात तापमानात प्रचंड घट होते. अनेक ठिकाणी तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. त्यामुळे या कडाक्याच्या थंडीचा सामना तेथील नागरिकांना करावा लागतो. कारण तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्याने त्या ठिकाणची दैनंदिन कामकाज मंदावते. तर हिवाळ्यात होणाऱ्या तापमानाच्या या तीव्र घसरणीमुळे भारतातील ही ठिकाणे सर्वात थंड शहरांपैकी एक मानली जातात. चला तर मग आजच्या लेखात आपण भारतातील सर्वात थंड ठिकाणं कोणती आहेत ते जाणून घेऊयात.

मनाली

मनाली हे पहिले ठिकाण आहे जिथे हिवाळा सुरू झाला की अनेकजण मनालीला पोहचतात. हिवाळा जवळ येताच येथे जोरदार बर्फवृष्टी होते. तर या ठिकाणी रात्री तापमान 0 अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते. त्यामुळे थंडीच्या दिवसात बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मनाली मध्ये लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.

कुलगाम

कुलगाममध्ये तापमानात सर्वाधिक घट होत असल्याची नोंद केली जाते, कुलगाममध्ये तापमान इतकं कमी होतं की लोकं रात्री घराबाहेर पडू शकत नाहीत. मात्र या तीव्र थंडीचा दैनंदिन कामकाजावर लक्षणीय परिणाम होतो.

गंगटोक

गंगटोकमध्ये हिवाळ्यात तापमानात घट होते. तथापि येथील तापमान कालांतराने बदलते. सकाळी तापमान मध्यम असते, परंतु संध्याकाळ होताच तापमानात लक्षणीय घट होते.

धर्मशाळा

धर्मशाळा हे असे ठिकाणं आहे जिथे तापमानात 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी झाल्यामुळे येथील लोकांना कडाक्याच्या थंडीचा व यापासून निर्माण होणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रात्र झाली की तापमानात लक्षणीय घट होते. शिवाय येथे हवामान सतत बदलत असते.

बारामुल्ला

थंडीच्या दिवसात बारामुल्लामधील तापमानात लक्षणीय घट होत असते. तापमानात सतत घट झाल्यामुळे रस्ते चिकट होतात. तर जानेवारी महिना हा येथील रहिवाशांसाठी सर्वात त्रासदायक असतो.

श्रीनगर

श्रीनगरमध्ये अत्यंत थंड हवामान आहे. येथील तापमान इतके कमी होते की येथील असलेलं दाल सरोवर पूर्णपणे गोठते.

सोपोर

सोपोर हे असे ठिकाणं आहे जिथे हिवाळा महिना सुरू होतातच सर्वत्र बर्फ आणि थंड वारे वाहत असतात. ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण होते.

ख्वाजा बाग

ख्वाजा बाग हे ठिकाण बारामुल्ला येथे आहे. तर या ख्वाजा बाग ठिकाणी सर्वात जास्त थंडी असते. तर या मौसमात पाण्याचे पाईप्सही गोठतात, ज्यामुळे लोकांना अनेक कामे करणे कठीण होते.

दार्जिलिंग आणि बांदीपोरा

दार्जिलिंगमध्ये विशेषतः थंडी असते, परंतु येथे अधूनमधून बर्फवृष्टी देखील होते. दरम्यान बांदीपोरामध्ये, वुलर तलाव गोठते, ज्यामुळे लोकांना तीव्र थंडीचा सामना करावा लागतो.