AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कूलरमधून येतोय प्रचंड दुर्गंधी वास? करा हे घरगुती उपाय, परत कधीच येणार नाही वास, मिळेल थंड फ्रेश हवा

जर तुमच्या देखील कुलरमधून दुर्गंधी किंवा विचित्र वास येत असेल तर आताच घरगुती पद्धतीने काही मिनिटांमध्ये कुलर करा साफ. मिळेल थंड आणि फ्रेश हवा.

कूलरमधून येतोय प्रचंड दुर्गंधी वास? करा हे घरगुती उपाय, परत कधीच येणार नाही वास, मिळेल थंड फ्रेश हवा
Image Credit source: Social media
| Updated on: May 10, 2026 | 2:05 PM
Share

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत कूलरचा वापर वाढतो. कडक ऊन, घामाने चिकटलेलं वातावरण आणि गरम खोलीत कूलरची थंड हवा मोठा दिलासा देते. मात्र अनेकदा कूलर सुरू करताच त्यातून माशांसारखी विचित्र दुर्गंधी येऊ लागते. ही दुर्गंधी इतकी त्रासदायक असते की संपूर्ण खोलीचं वातावरण खराब होतं. घरात पाहुणे आले असोत किंवा कुटुंब आराम करत असो, कूलरमधून येणारा हा वास सगळ्यांनाच अस्वस्थ करतो.

अनेकांना प्रश्न पडतो की बाहेरून स्वच्छ दिसणाऱ्या कूलरमधून इतकी घाणेरडी दुर्गंधी का येते? प्रत्यक्षात यामागे साचलेलं घाण पाणी, जुनी कूलर घास, बुरशी, जास्त ओलावा आणि बॅक्टेरिया ही मुख्य कारणं असतात. चांगली गोष्ट म्हणजे ही समस्या दूर करण्यासाठी महागडी क्लिनिंग प्रॉडक्ट्स खरेदी करण्याची गरज नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या काही वस्तूंनीच कूलर पुन्हा ताजा आणि स्वच्छ ठेवता येतो.

कूलरची दुर्गंधी दूर करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

1. पांढऱ्या व्हिनेगरचा वापर

व्हिनेगर हा नैसर्गिक क्लिनर मानला जातो. सर्वप्रथम कूलरची टाकी रिकामी करा. त्यानंतर स्वच्छ पाणी भरून त्यात 1 ते 2 कप पांढरा व्हिनेगर टाका. कूलर 10 ते 15 मिनिटे चालू ठेवा. यामुळे बॅक्टेरिया कमी होतात आणि दुर्गंधीही दूर होते.

2. बेकिंग सोडा वापरा

जर कूलरमधून जास्त वास येत असेल तर पाण्यात 2 ते 3 मोठे चमचे बेकिंग सोडा मिसळा. बेकिंग सोडा दुर्गंधी शोषून घेण्यास मदत करतो आणि पाणी ताजं ठेवतो.

3. कडुलिंबाची पाने

कडुलिंबामध्ये नैसर्गिक जंतुनाशक गुणधर्म असतात. कडुलिंबाची छोटी पोटली बनवून ती टाकीत ठेवा. किंवा नीम ऑईलचे काही थेंबही पाण्यात टाकू शकता.

4. लिंबाचा रस

कूलरमधून तीव्र वास येत असल्यास 4 ते 5 लिंबांचा रस पाण्यात मिसळा. यामुळे ताजेतवाना सुगंध येतो आणि दुर्गंधी कमी होते. घरगुती उपाय करूनही दुर्गंधी कमी होत नसेल, मोटरमधून आवाज येत असेल किंवा पाणी व्यवस्थित फिरत नसेल, तर तांत्रिक तज्ज्ञांकडून कूलरची सर्व्हिस करून घेणं आवश्यक ठरू शकतं. अनेकदा कूलरच्या आतील भागात घाण अडकलेली असते, जी सामान्य साफसफाईने निघत नाही.

Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा