AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tips and tricks: चश्म्याच्या काचा साफ करण्यासाठी करा ‘ या ‘ गोष्टींचा वापर, काही मिनिटांतच चमकेल चश्मा !

चश्म्याचा वापर आजकाल खूप कॉमन झाला आहे. मात्र काही दिवसांच्या वापरानंतर चश्म्याच्या काचा अस्वच्छ आणि धूसर होतात. त्यामुळे नीट दिसू शकत नाही. घरच्या घरी चश्म्याच्या काचा साफ करण्यासाठी काही उपाय करून पाहू शकता.

Tips and tricks: चश्म्याच्या काचा साफ करण्यासाठी करा ' या ' गोष्टींचा वापर, काही मिनिटांतच चमकेल चश्मा !
| Updated on: Aug 23, 2022 | 10:39 AM
Share

मुंबईः डोळ्यांची खास काळजी घेण्यासाठी सर्व लोक विशेष प्रयत्न करत असतात. तसेच डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चश्म्याचा (specs) वापर आजकाल खूप कॉमन झाला आहे. बरेच लोक उन्हापासून बचाव करण्यासाठी काळा चश्मा (black goggle) वापरण्यास पसंती देतात. तर दृष्टी कमी झाली असल्यास अनेक लोकांना नंबरचा चश्मा वापरावा लागतो. मात्र काही दिवसांच्या वापरानंतर चश्म्याच्या काचा अस्वच्छ आणि धूसर होतात. पण या काचा साफ (Eye glasses)करणे हे कठीण असते. बरेच प्रयत्न करूनही काही वेळा चश्म्याच्या काचा स्वच्छ होत नाहीत. अशा वेळी घरात काही उपाय करून चश्म्याच्या काचा (home remedies to clean specs) स्वच्छ करता येऊ शकतील. घरच्या घरी चश्म्याच्या काचा सहजपणे साफ करण्यासाठी काही उपाय करून पाहू शकता.

विच हेजलचा वापर करा –

विच हेजलचा वापर करून ग्लास क्लीनर तयार करण्यासाठी अर्धा कप डिस्टील्ड वॉटरमध्ये अर्धा कप विच हेजल घालून मिक्स करावे. आता हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून चश्म्याच्या काचांवर स्प्रे करावे आणि मायक्रोफायबर कापडाने काच स्वच्छ करावी.

व्हिनेगरचा वापर करावा –

व्हिनेगरचा वापर करून ग्लास क्लीनर तयार करण्यासाठी पाव कप पाण्यात पाऊण कप डिस्टील्ड व्हिनेगर मिसळावे. हे मिश्रण नीट एकत्र करावे. हे मिश्रण चश्माच्या काचांवर स्प्रे करून मायक्रोफायबर कापड वापरून काचा स्वच्छ पुसाव्यात. मायक्रोफायबर कापड नसेल सुती कापड वापरले तरी चालू शकेल.

अल्कोहोलही ठरेल फायदशीर –

चश्म्याच्या काचा स्वच्छ करण्यासाठी अल्कोहोलचा वापरही करू शकता. त्यासाठी पाव कप पाण्यात पाऊण कप रबिंग अल्कोहोल आणि डिश वॉश लिक्विडचे – थेंब टाकून नीट एकत्र मिक्स करावे. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवावे. चश्म्याच्या काचेवर याचे मिश्रण फवारून कापडाने स्वच्छ पुसावे. तुमच्या चश्म्याच्या काचा लगेच चमकू लागतील.

डिस्टिल्ड वॉटरही वापरून पहा –

चश्मा स्वच्छ करण्यासाठी डिस्टिल्ड वॉटरही फायदेशीर ठरू शकेल. त्यासाठी व्हिनेगर, डिस्टिल्ड वॉटर आणि रबिंग अल्कोहोल हे समप्रमाणात घेऊन स्प्रे बॉटलमध्ये भरावे. हे मिश्रण चश्म्याच्या काचांवर स्प्रे करून सुती कापडाने किंवा मायक्रोफायबर कापडाने स्वच्छ पुसावे

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.