AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील या राज्याची १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, देशाचे पहिले राज्य ठरले

देशात १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारे हे देशातील पहिले राज्य बनले आहे. या आधी ऑस्टेलियाने लहान मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी घातली आहे.

देशातील या राज्याची १६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, देशाचे पहिले राज्य ठरले
Ban on children's use of social media
| Updated on: Mar 06, 2026 | 4:20 PM
Share

आपले शेजारील राज्य कर्नाटक जेथे टेक्नॉलॉजीचे हब बंगलुरु आहे. त्या राज्याने १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांसाठी सोशल मीडिया बंदी लागू केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी असे सांगितले की असा निर्णय घेणारे ते भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. ते म्हणाले की मुलांवरील मोबाईलचा वाढता वापर दुष्परिणाम रोखण्यासाठी १६ वर्षांखालील कमी वयाच्या मुलांवर सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातली आहे. टॉयलेट बांधण्यासाठी ७५ कोटी आणि शाळांचे फर्निचर खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी सांगितले की राज्यात १६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरासाठी बंदी घालण्यात आली आहे. तसेच शाळा आणि कॉलेज आणि विद्यापीठात ड्रग्सचा वापराविषयी कठोर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

कर्नाटक विधानसभा अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करताना त्यांनी आश्वस्त केले की शाळा आणि कॉलेजातील रिक्त शिक्षकांच्या १५ हजार पदांना पुढच्या आर्थिक वर्षात भरले जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली सरकारी प्राथमिक, हायस्कुल आणि प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजात नवीन रुम्स बांधणे, दुरुस्ती करण्याच्या कामासाठी ५६५ कोटी रुपये, टॉयलेट बांधण्यासाठी ७५ कोटी रुपये आणि शाळांचे फर्निचर खरेदी करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे.

मुलांवर होणारा वाईट परिणाम रोखणे

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी शुक्रवारी राज्याचे २०२६-२७ चे बजेट सादर केले. त्यावेळी त्यांनी कर्नाटक सरकार १६ वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदी करण्याची योजना आणत असल्याची घोषणा केली.

मोबाईलचा वाढता वापराने त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी १६ वर्षांखालील मुलाच्या सोशल मीडिया वापरावर बंदी लादण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की या बंदीचा हेतू मोबाईल फोनचा वाढता वापराने मुलांवर होणारा वाईट परिणाम रोखणे महत्वाचे आहे. ते पुढे म्हणाले की IISC अंतर्गत AI आणि टेक पार्क, ISRO आणि कीओनिक्स सोबत मिळून बंगलुर रोबोटिक्स आणि AI इनोव्हेशन झोन नावाचा रोबोटिक्स आणि एआय कँपल बनवला जाणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...