नववर्षात हिल्स स्टेशनवर पोहोचलात? ‘या’ ड्रायव्हिंग टिप्स खास तुमच्यासाठी

नववर्षाच्या पूर्वसंध्येला हिल्स स्टेशनवर जाण्याचा बेत आखत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. या चुका टाळायला हव्यात. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचे अनुसरण करून तुम्ही ड्रायव्हिंग दरम्यान होणारे धोके टाळू शकता. त्यामुळे तुम्ही तुमची ट्रिप मस्त एन्जॉय करू शकता.

नववर्षात हिल्स स्टेशनवर पोहोचलात? या ड्रायव्हिंग टिप्स खास तुमच्यासाठी
Mountain driving
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 31, 2024 | 11:39 PM

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत किंवा एकट्याने कुठेतरी फिरायला गेला असाल. जर तुम्हाला हिवाळ्यात हिल्स स्टेशनवर सुट्टी घालवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जर तुम्ही हिल्स स्टेशवर जाण्यासाठी तुमची कार घेऊन गाडी चालवत असाल तर तुम्हाला काय काळजी घ्यावी लागेल. काय चुका करू नयेत. कारण हिल्स स्टेशन ठिकाणी गाडी चालवताना अनेक समस्या निर्माण होतात. तसेच वातावरण अनेकदा बदलत असते.

सध्या थंडीचे दिवस सुरू आहे. थंडीच्या दिवसात अनेक डोंगराळ भागातही धुके पडू लागले आहे. अशावेळी या भागात वाहन चालवण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जेणे करू तुमचा प्रवास ट्रिप चांगली होईल. चला तर मग जाणून घेऊयात

वेग नियंत्रण ठेवा

जेव्हा तुम्ही हिल्स स्टेशनवर फिरायला जाताना गाडी चालवणार असाल तेव्हा तुमच्या वाहनाचा वेग कमी ठेवा. कारण डोंगरांवर अनेक वळणदार मार्ग आहेत, ज्यावर तुम्ही भरधाव वेगाने वाहन चालवून अडचणीत येऊ शकता आणि ताशी ३० किलोमीटरपेक्षा जास्त वेग न ठेवण्याचा प्रयत्न करू शकता.

ओव्हरटेक करू नका

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ड्रायव्हिंग करताना तुम्ही कोणत्याही कार किंवा बाइकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. कारण डोंगरांवरील मार्ग छोटे असतात आणि ओव्हरटेक केल्याने तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो. अजिबात घाई करू नका. सुरक्षितपणे वाहन चालवून तुमच्या प्रवासाचा आनंद घ्या.

हवामानाकडे लक्ष द्या

डोंगर भागात हवामान क्षणाक्षणाला बदलते. त्यामुळे पाऊस किंवा बर्फवृष्टी झाल्यास वाहन चालविणे कठीण होते अश्या वेळेस गाडी चालवणे टाळावे. जास्त पाऊस पडत असेल तर गाडी बाजूला थांबवून इंडिकेटर चालू ठेवा. कारण अतिवृष्टी किंवा बर्फवृष्टीत घसरण्याचा धोका असतो.