AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचे सौंदर्य ते उंच डोंगरावरून ‘हे’ 5 रेल्वेप्रवास एकदा तरी आयुष्यात कराच

बाहेर फिरायला जाण्यासाठी ट्रिप प्लॅनिंगमध्ये प्रत्येकजण डेस्टिनेशन ठरवतो, परंतु या लेखात आम्ही तुम्हाला अशा पाच ट्रेन मार्गांबद्दल सांगणार आहोत जे इतके सुंदर आहेत की तुम्हाला प्रवासादरम्यान हा प्रवास असाच चालू राहावा असे वाटेल आणि तुम्हाला तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्यापेक्षा जास्त हाच प्रवास आवडेल. चला तर आजच्या लेखात जाणून घेऊयात भारतातील 5 सुंदर रेल्वेमार्गाचा प्रवास कोणता आहे.

निसर्गाचे सौंदर्य ते उंच डोंगरावरून 'हे' 5 रेल्वेप्रवास एकदा तरी आयुष्यात कराच
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 6:28 PM
Share

फिरायला जाण्याचा विचार केला की सर्वात आधी आपण ट्र्रिप प्लानिंग करतो. एक चांगले डेस्टिनेशन ठरवतो. त्यांनतर त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी प्रवास कसा करायचा याचा विचार केला जातो. तर बहुतेक लोकांना वाटते की प्रवास आरामदायी असावा आणि ठरवलेल्या डेस्टिनेशनवर पोहोचायचे. पण या प्रवासादरम्यान तुम्हाला जर डेस्टिनेशनपेक्षा त्या दरम्यानचा निसर्गाच्या सानिध्यातुन, उंच डोंगर रांगातुन तसेच समुद्रामधून होणारा प्रवास सुंदर वाटतो तेव्हा तुमच्या डेस्टिनेशला पोहोचण्याचे मन करत नाही असे वाटते की हे सुंदर दृश्य पाहत राहावे आणि हा प्रवास असाच सुरू राहावा. तर आजच्या या लेखात, आपण अशा मार्गांबद्दल जाणून घेऊ ज्यावरून ट्रेनचा हा प्रवास निसर्गाचे सुंदर दृश्य पाहून मन आनंदित तर करेलच, पण तुम्हाला आश्चर्यही वाटेल. तर आपल्या देशाचे रेल्वे नेटवर्क जगात चौथ्या क्रमांकावर आहे आणि ट्रेन जंगलांमधून, नद्यांवर बांधलेल्या पूलांमधून आणि उंच डोंगर रेल्वेमार्गावरून जाते. तर अशा काही रेल्वे मार्गांवरून जाणे तुमच्यासाठी आयुष्यभराचा संस्मरणीय प्रवास असेल.

तर तुम्ही ठरवलेल्या फायनल डेस्टिनेशनपर्यंतचा पोहोचण्याचा प्रवासही इतका आनंददायी असेल, तर प्रवासाची मजा द्विगुणीत होते. जेव्हा ट्रेनने प्रवास करण्याचा विचार येतो तेव्हा बहुतेक लोकं विंडो सीटवर बसणे पसंत करतात, कारण बाहेरचे दृश्ये अद्भुत दिसतात. जर तुम्हाला या लेखात नमूद केलेल्या ट्रेन मार्गांवरून प्रवास करण्याची संधी मिळाली तर तुम्ही विंडो सीट तिकिटे आधीच बुक करावीत. चला तर जाणून घेऊयात अशाच या पाच सुंदर रेल्वेमार्गाचा प्रवास जो तुमच्या आयुष्यभर स्मरणात राहील…

तामिळनाडूतील रामेश्वरम

तुम्ही तामिळनाडूहून रामेश्वरमला जाण्याचा प्लॅन करताय तर हा प्रवास फक्त ट्रेनने करावा. कारण रामेश्वरमला जाण्यासाठी हा रेल्वेप्रवास जेव्हा या समुदातून होतो तेव्हाचे हे बाहेरील दृश्य खूप अद्भूत दिसते. हा पूल समुद्रतळावर बांधला आहे. ट्रेनमधून तुम्हाला चारही बाजूनी सर्वत्र समुद्र दिसेल. 2.8 किमी लांबीच्या या रेल्वे पुलावरील प्रवास हा एक अद्भुत अनुभव असेल. तर हा पूल आधुनिक भारतीय तंत्रज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे.

जैसलमेर ते जोधपूर

तुम्ही एकदा जैसलमेर ते जोधपूर ट्रेनने प्रवास करायला हवा. या ट्रेनचे नाव ‘वाळवंटाची राणी’ आहे. हा मार्ग तुम्हाला एक आश्चर्यकारक अनुभव देईल. खरं तर जैसलमेर ते जोधपूर संपुर्ण प्रवास दरम्यान ट्रेन वाळवंटाच्या मधून प्रवास करते. तर ही ट्रेन देखील खूप खास आहे कारण ती राजस्थानच्या पारंपारिक शैलीने सजवण्यात आली आहे.

कालका ते शिमला

वाळवंटातील राणीप्रमाणे तुम्ही एकदा ‘हिमालयाची राणी’ या ट्रेनने प्रवास करायलाच हवा. ही ट्रेन तुम्हाला कालका ते शिमला घेऊन जाते आणि ती टॉय ट्रेन म्हणूनही प्रसिद्ध आहे. ही ट्रेन अनेक बोगदे आणि पुलांवरून जाते आणि तुम्हाला अद्भुत दृश्ये पाहता येतात.

मुंबई ते गोवा प्रवास

तुम्ही एकदा मुंबई ते गोवा ट्रेनने प्रवास करायला हवा. हा ट्रेन प्रवास कोकणातील सुंदर आणि अद्भुत दृश्यांसाठी ओळखला जातो. जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही निसर्गात हरवून जाल. या मार्गावर तुम्हाला हिरवळीपासून ते नद्या, धबधबे आणि बोगद्यांपर्यंत सर्व काही पाहायला मिळेल.

मेट्टुपलयम ते ऊटी प्रवास

तुम्ही मेट्टुपलयम ते ऊटी असा प्रवास ट्रेनने करावा. निलगिरी माउंटन रेल्वे लाईनवरून जाणारी निलगिरी टॉय ट्रेन सुंदर निसर्गाचे दृश्य दाखवत जाते. निसर्गाचे दृश्य तुम्हाला आश्चर्यचकित करतेच शिवाय तुम्ही हे दृश्य पाहून मंत्रमुग्ध होता. त्यात हा रेल्वेप्रवास असाच सुरू राहावा असे वाटत असते.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.