Travel Ideas : प्रवासासाठी निघाला आहात?; मग हे खाद्यपदार्थ सोबत ठेवा

| Updated on: Feb 17, 2022 | 5:30 AM

Travel tips in marathi:प्रवासात अनेक जण बाहेरचेच अन्न पदार्थ खातात. मात्र बाहेरच्या जेवणामुळे पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही आजारी देखील पडू शकतात. त्यामुळे शक्यतो बाहेर फीरण्यासाठी निघाल्यानंतर घरातीलच अन्नपदार्थ सोबत घ्यावेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांबद्दल माहिती सांगणार आहोत, की जे तुम्ही प्रवासादरम्यान स्वत:सोबत ठेवू शकता. तसेच ते दीर्घकाळ चांगले राहातात.

1 / 5
बटाट्याची भाजी : तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्यासोबत बटाट्याची भाजी ठेऊ शकता. ही भाजी व्यवस्थित पॅक केलेली असेल तर ती दोन दिवस ताजी व खाण्या योग्य राहाते.

2 / 5
दुधात मळलेल्या पिठाची रोटी : असे दिसून आले आहे की, दुधात मळलेल्या पिठापासून बनवलेल्या गोष्टी अनेक दिवस चांगल्या व खाण्यायोग्य राहातात. त्यामुळे दुधाच्या पिठापासून बनवलेलेल्या साध्या रोट्या तुम्ही प्रवासादरम्यान तुमच्यासोबत घेऊ शकता. मुलांना देखील असे पदार्थ आवडतात.

3 / 5
नाश्ता : प्रवासादरम्यान मध्येच केव्हाही भूक लागते, अशा परिस्थितीमध्ये जेवन करणे शक्य नसते. मग अशावेळी तुम्ही नाश्ता करू शकता. अशावेळी नाश्ता म्हणून तुम्ही तुमच्यासोबत घरी बनवलेला मुरमुऱ्याचा चिवडा, फरसान असे कोरडे पदार्थ सोबत ठेवू शकता, असे पदार्थ अनेक दिवस टिकतात.

4 / 5
चटणी : चटणी हा देखील असा एक पदार्थ आहे जो अनेक दिवस टिकतो. चटणी शेंगदाने, मिरच्या, खोबरे, जवस अशी कशाची देखील असू शकते. भाज्या लवकर खराब होतात. त्या मानाने चटणी उशीरा खराब होते. भाजी नसेल तर चणीसोबत देखील तुम्ही पोळी खाऊ शकता.

5 / 5
 कारल्याची भाजी : प्रवासामध्ये तुम्ही तुमच्यासोबत कारल्याची भाजी देखील घेऊ शकता. फक्त कारल्याची भाजी करताना ती पाण्यात शिजवू नका. पाणी न वापरता केलेली कारल्याची भाजी देखील दोन दिवस टिकते.