महाराष्ट्रातील इटलीसारखे दिसणाऱ्या ‘या’ हिल स्टेशनला नक्की द्या भेट
धावपळीच्या धकाधकीच्या जीवनातून सकारात्मक विश्रांती घेण्यासाठी अशा ठिकाणांच्या फिरायला जाण्याचा प्लॅन करा. तर महाराष्ट्रात असेच एक सुंदर ठिकाण आहे ज्याला "भारताचे इटली" म्हणून ओळखले जाते. चला तर मग या ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात.

भारतात असो किंवा जगात कुठेही जेव्हा अनेकजण बाहेर फिरायला जाण्याचा विचार करतात तेव्हा प्रत्येकजण त्यांच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जात असतात. काहींना फक्त ऐतिहासिक स्थळे किंवा वास्तूंचा सदंर्भात ठिकाणी जायला आवडत् तर बहुतेक लोकं नैसर्गिक सौंदर्य आणि शांतता देणारी ठिकाणे फिरणे पसंत करतात. अशी ठिकाणे प्रत्येकासाठी आकर्षणाचे केंद्र असतात. भारतातच इतके आश्चर्यकारक नैसर्गिक सौंदर्य आहे जे परदेशांनाही मागे टाकते. विशेषतः लोकं रोजच्या धावपळीच्या ताणतणाव विसरून डोंगराळ निसर्गाच्या सानिध्यात जाऊन एखाद्या ठिकाणाला भेट देतात. त्यात तुम्हाला जर इटली सारखा देश फिरण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आता इटलीला जाण्याची आवश्यकता नाही, कारण भारतात असेच एक सुंदर ठिकाण आहे आणि ते भारताचे “मिनी इटली” म्हणून देखील ओळखले जाते. तुम्ही तिथे फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता. तर आजच्या लेखात आपण या ठिकाणी कसे जाऊ शकता योग्य वेळ कोणती आहे ते जाणून घेऊयात.
आपण ज्या ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते महाराष्ट्रात आहे. येथील अनोखे वातावरण प्रत्येक पर्यटकाला आश्चर्यचकित करते. त्याच्या रंगीबेरंगी रस्त्यांपासून ते तलावाच्या काठाच्या दृश्यांपर्यंत, असे वाटते की जणू काही तुम्ही शांतता आणि सौंदर्याने भरलेल्या दुसऱ्या जगात पोहोचला आहात. महाराष्ट्रातील हे ठिकाण कुठे आहे, तिथे कसे जायचे आणि त्याला भारताचे “मिनी इटली” का म्हटले जाते ते जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील लवासा
महाराष्ट्रातील लवासा हे भारताचे मिनी इटली म्हणून ओळखले जाते. खरं तर हे ठिकाण इटालियन रिव्हिएरावरील पोर्टोफिनो या ठिकाणंच हे सुंदर शहर डिझाइन केले गेलेलं आहे. त्याच्या रंगीबेरंगी मेडिटेरेनियन स्टाइलच्या इमारती, तलावाच्या आसपास फिरण्यासाठी आणि दगडी रस्ते या ठिकाणाला एक अद्भुत युरोपियन वातावरण देतात. सह्याद्री टेकड्यांनी वेढलेले आणि वरसगाव तलावाच्या काठावर वसलेले, लवासा हे नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक नियोजनाचे परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे ते भारतात इटालियन शहराचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
लवासाला फिरण्यासाठी असा करा प्लॅन
तलावाच्या आसपास फिरा
तुम्ही जर लवासाला भेट देत असाल तर लवासाचे हृदय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेथील तलावाला नक्की भेट द्या. वरसगाव तलाव आणि त्याच्या रंगीबेरंगी मेडिटेरेनियन स्टाइलच्या इमारतीचे अद्भूत दृश्य पाहायला मिळते. आरामदायी शांततेत फेरफटका मारण्यासाठी, सायकलिंग करण्यासाठी किंवा फक्त तलावाच्या काठावर बसून, नैसर्गिक दृश्यांचे कौतुक करण्यासाठी आणि फोटो आणि व्हिडिओ क्लिक करण्यासाठी हे ठिकाण खूप छान आहे.
लवासा येथील ॲडव्हेंचर खेळ
तुम्ही जर ॲडव्हेंचर प्रेमी असाल, तर हे ठिकाण तुमच्यासाठी स्वर्ग आहे. तुम्ही तलावावर जेट स्कीइंग आणि कायाकिंग सारख्या पाण्याच्या ॲक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता. जर तुम्हाला ट्रेकिंग आणि माउंटन बाइकिंग आवडत असेल, तर टेकड्यांवर जा, जिथे तुम्हाला ॲडव्हेंचर आणि आश्चर्यकारक नैसर्गिक दृश्ये या दोन्ही गोष्टींचा आनंद घेता येईल.
View this post on Instagram
लवासामध्ये युरोपचा आस्वाद घ्या
तुम्ही तलावाकाठी असलेल्या कॅफे आणि रेस्टॉरंट्सना भेट देऊ शकता, जे युरोपियन शैलीतील वातावरणात स्वादिष्ट अन्न पदार्थ आस्वाद घेता येतो. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशातील विविध प्रकारचे पदार्थ देखील खायला मिळतील. हे फक्त जेवणापुरते मर्यादित नाही, तर नैसर्गिक दृश्ये देखील आनंददायी आहेत.
लक्झरी रिसॉर्ट्समधील विहंगम दृश्ये
लवासा हे एक उत्साही ठिकाण आहे, जे हिरवळ आणि नैसर्गिकरित्या धुक्याने व्यापलेल्या टेकड्यांनी भरलेले आहे. त्यामुळे येथील रिसॉर्टमध्ये तुम्ही आराम करता करता किंवा फिरता फिरता असे निसर्गाचं रोमांचक दृश्ये पाहू शकता. तसेच येथील ताजी हवा तुम्हाला सकारात्मक उर्जेने भरून टाकतील. येथे लक्झरी रिसॉर्ट्स देखील आहेत, ज्यामुळे मुक्काम हा आयुष्यभराचा अनुभव बनतो, कारण ते तलाव आणि सह्याद्री पर्वतांचे नेत्रदीपक दृश्ये देतात.
View this post on Instagram
लवासाला कसे पोहोचायचे?
ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भेट देणे चांगले आहे. लवासा हे महाराष्ट्रात आहे. त्यामुळे तुम्ही येथे जाण्यासाठी बाय रोड स्वत:च्या गाडीने जाऊ शकता, रेल्वे आणि विमान अशा तिन्ही मार्गाने या ठिकाणी पोहोचू शकता. लवासा येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला पुण्याला जावे लागेल, जे सुमारे 57 किलोमीटर अंतरावर आहे. ते मुंबईपासून सुमारे 190 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणांहून तुम्ही टॅक्सी किंवा कारने प्रवास करावा, कारण वाटेतील दृश्ये मनमोहक आहेत. लवासा येथे पोहोचण्यासाठी दीड ते दोन तास लागतील. वाहतुकीसाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार ट्रेन आणि विमान यापैकी एक निवडू शकता.
