AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snowfall Destination : डिसेंबरची वाट कशाला? ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच मिळू शकतो स्नोफॉलचा अनुभव! भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट

Snowfall Destination : भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये स्नोफॉल होतो. पर्यटक नेहमीपेक्षा थोडं लवकर प्रवास करून कमी गर्दीत या सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकतात. जाणून घ्या ही बेस्ट ठिकाणं कोणती आहेत

Snowfall Destination : डिसेंबरची वाट कशाला? ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्येच मिळू शकतो स्नोफॉलचा अनुभव!  भारतातील ‘ही’ ठिकाणं आहेत बेस्ट
Snowfall
| Edited By: | Updated on: Oct 16, 2026 | 11:18 AM
Share

हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये हिवाळ्याचे आगमन झाले असून, अनेक पर्वतीय प्रदेशांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. हिवाळ्याचे पिक महिने सुरू होण्यापूर्वी तुम्हाला बर्फ पाहायचा असेल, तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे फिरण्यासाठी बेस्ट महिने आहेत. पर्वत पांढरे शुभ्र होत आहेत, हवेत हलका गारवा पसरला आहे आणि ताज्या बर्फवृष्टी नंतरची दृश्ये अधिकच नेत्रदीपक दिसतात. काश्मीरपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडपर्यंत, काही ठिकाणी हिवाळ्याचे स्वागत आधीच सुरू झाले आहे. या सीझनमध्ये लवकर स्नोफॉल पाहण्यासाठी ही ठिकाणं बेस्ट आहेत.

तापमानात घट होऊ लागली की सोनमर्गमध्ये बर्फवृष्टीची शक्यता वाढते. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये येथील उंच पर्वतरांगा बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकल्या जातात. उन्हाळ्यात हिरव्यागार दिसणाऱ्या कुरणांचं सौंदर्य या काळात काहीसं बदलतं आणि बर्फाच्छादित शिखरं पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. पीक टूरिस्ट सीझन सुरू होण्याआधी सोनमर्गच्या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठीही हा काळ चांगला ठरू शकतो.

झोजिला पास, लडाख

काश्मीर आणि लडाखला जोडणारा झोजिला पास हा उंच पर्वतीय मार्ग आहे. येथील उंची आणि बदलतं हवामान यामुळे इतर अनेक भागांच्या तुलनेत बर्फवृष्टी लवकर सुरू होते. बर्फाच्छादित डोंगर, खडकाळ प्रदेश आणि दूरवर पसरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा येथील दृश्य अधिकच मनमोहक बनवतात. या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना बर्फाने झाकलेल्या पर्वतांचं विहंगम दृश्य अनुभवता येतं.

मनाली, हिमाचल प्रदेश

ऑक्टोबरच्या अखेरीस मनालीमध्ये थंडीचा प्रभाव जाणवू लागतो. या काळात मुख्य शहरात बर्फवृष्टी होईलच असं नाही; मात्र, मनालीच्या आसपासच्या उंच भागांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता असते. बर्फाच्छादित पर्वतरांगा, निसर्गरम्य दऱ्या आणि आल्हाददायक वातावरण यामुळे मनाली पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरतं.

Follow Us
धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
Dharashiv FDA Action : धाराशिवमध्ये FDA चा दणका; 15 दिवसांत सहा हॉटेल्सचे परवाने निलंबित
महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय?
Mahayuti : महायुतीत तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेटचा प्रयत्न; पडद्यामागे काय घडतंय?
10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती....
FDA : 10 कोटींची सुपारी फक्त कागदोपत्रीच नष्ट; त्या नेत्याने दिली माहिती, FDA च्या पाच अधिकाऱ्यांवर थेट...
आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
CJP Protest : आज मुंबईच्या आझाद मैदानात सीजेपीचं लहरा दो तिरंगा आंदोलन...
डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
Malegaon Case | डोंगराळे प्रकरणी आरोपीला फाशी की जन्मठेप? आज होणार निर्णय...
फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला..
Mahayuti : फडणवीस बोलले, महायुती म्हणून एकत्र लढू; शिंदेंचा मात्र अपक्षाला खुला पाठिंबा, नेमकं प्रकरण काय?
दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे....
CJP Tiranga Rally : दिल्लीत आज सीजेपीची लहरा दो तिरंगा रॅली; रॅलीकडे देशाचं लक्ष
ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल
Abhijeet Dipke : ज्ञानेश कुमार मोदींना काय देतात? अभिजीत दिपकेंचा थेट सवाल, दिल्लीचं रूपांतर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?