AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आठवड्यातून हा मासा फक्त दोनच दिवस खा, केस गळती थांबेल अन् हृदयासाठी तर फारच फायदेशीर

ज्यांना मांसाहारामध्ये मासा खायला आवडतो हा मासा फक्त चवीलाच नाही तर तो शरीरासाठीही तितकाच फायदेशीर असतो. हा मासा दर आठवड्याला फक्त दोनच दिवस खाल्ला तरी केस गळती थांबेल, हृदयासाठी देखील खूप फायदेशीर ठरतात. एवढंच नाही तर या माशामध्ये अनेत व्हिटॅमिन असतात.

आठवड्यातून हा मासा फक्त दोनच दिवस खा, केस गळती थांबेल अन् हृदयासाठी तर फारच फायदेशीर
Tuna FishImage Credit source: Meta AI
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Jul 03, 2025 | 4:37 PM
Share

मांसाहारी लोकांना चिकन असो, मटण असो, अंडी असो सर्वच आवडतं असतं. पण बऱ्याचदा काहीजणांना मांसाहारामध्ये फक्त मासेच खायला आवडतात. आणि मटण किंवा चिकनपेक्षा मासे खाणे जास्त पौष्टीक असतात असं म्हटलं जातं. माशांमध्ये पापलेट, सुरमई, कोळंबी हे शक्यतो आवडते असतात. पण तुम्हाला माहित आहे का? की एक मासा असाही आहे की, जो फक्त चवीलाच नाही तर शरीरासाठी देखील तेवढाच औषधी मानला जातो. हा मासा खाल्ल्याने केसांच्या समस्या दूर होतात.

हा मासा म्हणजे रोहू, कटला. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रोहू-कटला सारखे मासे पोषणाचे एक पॉवरहाऊस आहे. पण याहीपेक्षा एक मास असा आहे जो यापेक्षीही जास्त पौष्टीक मानला जातो.जर तुम्ही आठवड्यातून दोन दिवसही हा मासा खाल्ला तर काही दिवसांत केस गळणे थांबू शकते. हाडांचा आजार दूर होतात. शरीराला पोषण मिळते.

चला या माशाबद्दल जाणून घेऊया. या माशाचे नाव टूना आहे. हे इतके शक्तिशाली असतात. 85 ग्रॅम टूना माशात 21 ग्रॅम प्रथिने असतात. त्यात कार्बोहायड्रेट नसते आणि निरोगी चरबी 1 ग्रॅम असते. याशिवाय, त्यात जीवनदायी घटक असतात जसे की व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी12, नियासिन, सेलेनियम, व्हिटॅमिन बी6, ओमेगा 3 फॅटी अॅसिड जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात.

फिशमध्ये कॅल्शियम देखील भरपूर असते

नवी दिल्लीतील आहारतज्ज्ञ पूनम दुनेजा म्हणतात की, टूना फिशमध्ये कॅल्शियम देखील भरपूर असते जे हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. यासोबतच, त्यात नियासिन, सेलेनियम, फॉस्फरस सारखे घटक असतात जे केसांना पोषण देतात. म्हणून, जर तुम्ही आठवड्यातून दोन दिवसही ते खाल्ले तर केस गळणे थांबू शकते.

हृदयासाठी खूप फायदेशीर असतात

टूना फिशमध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात जे हृदयासाठी खूप फायदेशीर असतात. टूना फिशचे सेवन कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. या माशाच्या सेवनाने रक्तदाब देखील नियंत्रित होतो. कमकुवत दृष्टी असलेले आणि मानसिक ताणतणावाने ग्रस्त असलेले लोक आठवड्यातून दोनदा हा मासा खाऊ शकतात. हा मासा मानसिक ताण कमी करतो आणि केसांच्या वाढीस मदत करतो. तुम्ही तो मंगलोर स्टाईल सूप म्हणून देखील खाऊ शकता.

अतिशय चवदार मासा

या माशाची पाठ निळ्या-हिरव्या रंगाची आणि तोंड त्रिकोणी आकाराचे आहे. त्याला फक्त काटेरी शेपटी आहे पण पंख नसतात. पोहताना तो त्याच्या शेपटीने स्वतःला पुढे नेतो. तो जास्तीत जास्त 21 सेमी लांबीपर्यंत वाढू शकतो आणि त्याचे वजन 1.5 किलोपेक्षा जास्त नसते. हा एक अतिशय चवदार मासा आहे. हे टूना मासे हिंदी महासागर आणि पश्चिम प्रशांत महासागरात आढळतात. हे मासे अन्नाच्या शोधात गटांमध्ये फिरतात. त्यांच्या अन्नात लहान जीव, माशांची अंडी आणि समुद्री वनस्पतींवर वाढणारे शेवाळ यांचा समावेश आहे.

टूना मासा अनेक पौष्टिक घटकांनी समृद्ध असतो. गर्भवती महिलांनाही त्याची चव आवडते. टूना माशाची किंमत 50 ते 60 रुपये असते. म्हणजेच त्याची किंमतही खूप कमी आहे. ज्यांना त्याची चव एकदा समजली असेल नेहमी हेच मासे खातील हे नक्की.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...
मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई...
Malegaon : मालेगाव महापालिका आयुक्त रवींद्र जाधव यांच्यावर ACB ची कारवाई; नेमकं काय घडलं?
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना आवाहन
MLC नीकालांनंतर राजकीय चिखलफेक टाळा! महायुतीतील नेत्यांना नरेश म्हस्के यांचे आवाहन
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार...
नागपूरच्या निकालावरून नितेश राणे काँग्रेसवर भडकले; 17 हजार बाद मतांवरही उपस्थित केले प्रश्न!