निरोगी त्वचेसाठी रोज घ्या कोबी, भोपळा, काकडी, बीटरूट आणि टॉमेटोचा ज्यूस; त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी ज्यूस आहे फायदेशीर!

उन्हाळ्यात हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. उन्हाळ्याच्या सुटीत अनेकजण फिरायला जाण्याचे बेत आखतात. अशा परिस्थितीत त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी काही भाज्यांचे ज्यूस खुप फायदेशीर ठरतात.

निरोगी त्वचेसाठी रोज घ्या कोबी, भोपळा, काकडी, बीटरूट आणि टॉमेटोचा ज्यूस; त्वचा निरोगी आणि सुंदर ठेवण्यासाठी ज्यूस आहे फायदेशीर!
Vegetable Juice
Image Credit source: TV9
सागर जोशी

|

Jun 27, 2022 | 10:59 PM

मुंबई : त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी आपण अनेक प्रकारची सौंदर्य उत्पादने (Beauty products) वापरतो. अशा परिस्थितीत, त्वचेचे खोल पोषण करण्यासाठी आपण निरोगी पदार्थांचे सेवन करणे महत्वाचे आहे. त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही भाज्यांचा ज्यूस (Vegetable juice) सेवन करू शकता. हंगामी फळे आणि भाज्यांचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. सुटीत अनेकजण फिरायला जाताता अशा वेळी त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे असते, यासाठी काही भाज्यांचे ज्यूस खुप फायदेशीर ठरतात. भाज्यांच्या ज्यूसमध्ये सर्वाधिक पिला जाणारा ज्यूस म्हणजे काकडीचा ज्यूस. काकडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, सिलिका, कॅल्शियम आणि पॅन्टोथेनिक ऍसिड (Pantothenic acid) यांसारखे पोषक घटक असतात. हा रस त्वचेला डागरहित आणि दीर्घकाळ हायड्रेट ठेवण्यास मदत करतो. त्यामुळे हा रस नियमित प्या.

बीटरूट चा ज्यूस

निरोगी त्वचेसाठी तुम्ही बीटरूटचा वापर करू शकता. बीट ज्यूसचा नियमीत आहारात समावेश करू शकता. बीटच्या रसामुळे त्वचा चमकदार होते. बीटरूटमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डाग दूर होण्यास मदत होते. ते तुमच्या त्वचेला ग्लो आणते. ते तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणते.

भोपळा आणि पुदिन्याचा ज्यूस

उन्हाळ्यात दुधी भोपळ्याचे सेवन केल्याने तुम्हाला हायड्रेट राहण्यास मदत होते. भोपळ्यात भरपूर पाणी असते. भोपळा म्हणजेच, लौकी ही उत्तम भाजी असून, याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. निरोगी त्वचेसाठी तुम्ही भोपळ्याच्या ज्यूसचे सेवन करू शकता. हा रस तयार करण्यासाठी तुम्हाला भोपळा, पुदिन्याची पाने, आवळा, आले आणि खडे मीठ या गोष्टींचे मिश्रण करून तयार झालेला ज्यूस गाळून पिण्यास घ्या.

कोबी आणि काकडीचा ज्यूस

कोबीचा रस त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. त्यात सी आणि के जीवनसत्त्वे असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेचे मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानीपासून संरक्षण करते. हे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करते. निरोगी त्वचेसाठी तुम्ही या रसाचा आहारातही समावेश करू शकता.

टोमॅटोचा ज्यूस

टोमॅटो टॅनिंगपासून मुक्त होण्यास मदत करते. त्वचेला टवटवीत ठेवण्यास मदत होते. हे मुरुमांवर उपचार करते. हे उघडे छिद्र संकुचित करते. त्यामुळे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित राहण्यास मदत होते. दररोज सकाळी या रसाचे सेवन करणे केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें