Happy New Year 2021 | कोरोनाकाळात व्हर्चुअली नवे वर्ष साजरे करताय? ‘या’ पार्टी आयडिया नक्की ट्राय करा!  

| Updated on: Dec 31, 2020 | 11:27 AM

आपण सगळेच नव्या वर्षाची आतुरतेने वाट बघत आहोत. 2020ला अखेरचा ‘गुडबाय’ म्हणण्याची सगळी तयारी झाली आहे.

Happy New Year 2021 | कोरोनाकाळात व्हर्चुअली नवे वर्ष साजरे करताय? ‘या’ पार्टी आयडिया नक्की ट्राय करा!  
Follow us on

मुंबई : आपण सगळेच नव्या वर्षाची आतुरतेने वाट बघत आहोत. 2020ला अखेरचा ‘गुडबाय’ म्हणण्याची सगळी तयारी झाली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे यामुळे हे वर्ष खूपच वेगळे होते. आता येणारे नवीन वर्षब तरी प्रत्येकासाठी खूप आनंद आणेल, अशी आशा सगळेच व्यक्त करत आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे बरेच लोक यंदाचे नवीन वर्ष घरीच साजरे करत आहेत (Virtual party ideas for new year 2021 celebration).

दरवर्षी आपण सगळेच रेस्टॉरंट्स आणि क्लबमध्ये किंवा बाहेर कुठेतरी जाऊन लोक नवीन वर्ष साजरे करतात. मात्र, कोरोनामुळे हे वर्ष खूपच वेगळे ठरले आहे. साथीच्या या रोगामुळे, बहुतेक लोकांनी सोशल डिस्टंन्सगच्या नियमांचे अनुसरण करून घरीच नवीन वर्ष साजरे करण्याची योजना आखली आहे. तर, बऱ्याच लोकांना ही व्हर्चुअल सेलिब्रेशनची संकल्पना बोरिंग वाटत आहे. घरीच नवीन वर्ष साजरे करणे कंटाळवाणे आहे असे तुम्हालाही वाटत असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही मनोरंजक संकल्पना आणल्या आहेत. या कल्पनांच्या सहाय्याने आपण आपल्या मित्रांसह नवीन वर्ष जोशात साजरे करू शकता.

मुव्ही मॅरेथॉन

चित्रपट पाहणे कोणाला आवडत नाही? ही एकमेव गोष्ट अशी आहे, जी करण्यास कंटाळा करत नाही. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपला एखादा छानसा, आपला आवडता चित्रपट बघण्याचा प्लान करू शकता. आपण आपल्या नातेवाईकांसह आणि मित्रांसह, चटपटीत स्नॅक्सचा आनंद घेत चित्रपट बघण्याची मजा लुटू शकता ((Virtual party ideas for new year 2021 celebration)).

व्हर्च्युअल काऊंटडाऊन

व्हिडिओ कॉलवर बोलत आपण आपल्या मित्रांसह नवीन वर्षाचे स्वागत करू शकता. सोबतच गाणी आणि जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता. रात्री 11.55 वाजता, व्हिडीओ कॉलवरच आपल्या मित्रांसह वेळेची उलट मोजणी करून, 12च्या ठोक्याला एकमेकांना नवीन वर्षाची शुभेच्छा देऊ शकता.

थीम पार्टी

थीम पार्टीचे आयोजन नेहमीच मजेदार असते. परंतु, थेट घरी जाण्याऐवजी आपण आपल्या मित्रांसह व्हर्च्युअल मास्क पार्टी आयोजित करू शकता. या व्हर्चुअल मास्क पार्टीत आपण आपल्या मित्रांसह व्हिडीओ कॉलद्वारे सामील होऊ शकता.

ऑनलाईन गेम

कोरोना काळात ऑनलाईन गेम खेळण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. याच ट्रेंडला फॉलो करत आपण आपल्या मित्रांसह आणि नातेवाईकांसह ऑनलाईन गेम खेळू शकता. ऑनलाईन गेम्समध्ये प्रत्यक्ष न भेटताही एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेता येतो.

(Virtual party ideas for new year 2021 celebration)

हेही वाचा :