AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिवरच्या आजारापासून बचाव करण्यासाठी किती अक्रोड खाऊ शकता?

अक्रोड हे एक सुपरफूड म्हणून काम करते जे लिवरचे रक्षण करण्यासोबतच संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असते. रोजच्या आहारात अक्रोड किती प्रमाणात खावे तसेच याच्या सेवनाने लिवरचे संरक्षण कसे होते ते आजच्या या लेखात जाणून घेऊयात...

लिवरच्या आजारापासून बचाव करण्यासाठी किती अक्रोड खाऊ शकता?
walnut
| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 12:32 PM
Share

लिवर हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव असून शरीराचे पॉवरहाऊस म्हणून काम करते. जो पचन, विषारी पदार्थ बाहेर काढून टाकणे आणि शरीरात ऊर्जा साठवण्याचे काम करतो. परंतु बदलती जीवनशैली आणि बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि मद्यपान यामुळे आजकाल लिवरशी संबंधित समस्या झपाट्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत आहारात अशा गोष्टींचा समावेश करणे महत्वाचे आहे, ज्यामुळे लिवर मजबूत होते. अशातच आपण प्रत्येकजण ड्रायफ्रुट्सचे सेवन करत असतो. तर त्यात असलेले अक्रोड एक त्यापैकी आहे, जे लिवरसाठी खूप फायदेशीर मानले जाते. अक्रोडचे सेवन केल्याने लिवरचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते आणि लिवर एंझाइमची रक्त पातळी सुधारते…

अक्रोड लिवरचे संरक्षण कसे करते?

1. ओमेगा-3 फॅटी ॲसिडचा उत्कृष्ट स्रोत

अक्रोडमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी ॲसिड लिवरची जळजळ कमी करण्यास मदत करतात. यासाठी अक्रोडचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने फॅटी लिवर डिसीजचा धोका कमी होतो.आणि लिवरच्या पेशींना निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

2. ग्लूटाथिओन आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध

अक्रोडमध्ये ग्लूटाथिओन आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात, जे लिवरला डिटॉक्सिफाय करण्यास आणि ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करण्यास मदत करतात.

3. फायबर आणि प्रथिनांचा चांगला स्रोत

अक्रोड मध्ये असलेले हे दोन्ही पोषक तत्व पचनसंस्थेचे कार्य सुधारवतात, ज्यामुळे लिवरवर अतिरिक्त दबाव पडत नाही आणि ते आपली भूमिका अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्यास सक्षम होते.

4. चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते

अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवते, ज्यामुळे लिवर आणि हृदय दोन्ही निरोगी राहतात.

फॅटी लिव्हर नियंत्रित करण्यास उपयुक्त

अभ्यासातून असे आढळून आले आहे की नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिवर डिसीज (NAFLD) चा धोका कमी होतो.

दिवसातून किती अक्रोड खावेत?

आरोग्य तज्ञांच्या मते, दररोज 3-4 अक्रोड खाणे पुरेसे आहे. तुम्ही हे अक्रोड रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याच्या स्वरूपात खाऊ शकतात. मात्र याचे जास्त सेवन करू नका. कारण यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते, म्हणून संतुलन राखणे महत्वाचे आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....