AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

परफ्यूम वापरताना तुम्हीही करताय ‘ही’ चूक? जाणून घ्या परफ्यूम दीर्घकाळ टिकवण्यासाठी 5 खास ट्रिक्स!

महागडे परफ्यूम विकत घेऊनही जर तुम्हाला त्याचा सुगंध फार वेळ टिकत नसेल, तर या ट्रीक्स नक्की वापरून पहा. हे उपाय अगदी साधे आहेत, त्यामुळे दररोजच्या परफ्यूम वापराच्या सवयींमध्ये याचा समावेश केल्यास तुम्ही दिवसभर फ्रेश आणि सुगंधित राहू शकता.

परफ्यूम वापरताना तुम्हीही करताय 'ही' चूक? जाणून घ्या परफ्यूम दीर्घकाळ टिकवण्यासाठी 5 खास ट्रिक्स!
| Edited By: | Updated on: Jun 20, 2025 | 2:23 PM
Share

उन्हाळ्यात घामाच्या वासामुळे अनेक जण परफ्यूमचा वापर करतात. स्वच्छ व सुंदर सुगंधासाठी परफ्यूम ही पहिली पसंती असते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की अनेकदा आपण परफ्यूम लावताना काही चुकीच्या सवयींमुळे त्याचा सुगंध फार वेळ टिकत नाही? परफ्यूम लावण्याचे काही खास नियम असतात, जे पाळले तर महागडे परफ्यूमही संपूर्ण दिवस तुमच्या अंगावर सुगंध देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया परफ्यूम दीर्घकाळ टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

1. परफ्यूम लावण्याची योग्य जागा निवडा

परफ्यूम लावण्याची योग्य ठिकाणं म्हणजे शरीरातील ‘पल्स पॉइंट्स’ जिथे रक्ताभिसरण जास्त असतो. यामध्ये कलाई, मान, कानामागची जागा, कोपऱ्याची आतली बाजू आणि गुडघ्यांच्या मागची जागा यांचा समावेश होतो. या भागांवर परफ्यूम लावल्यास शरीराच्या उष्णतेमुळे त्याचा सुगंध अधिक काळ टिकतो.

2. मॉइश्चराइज केलेल्या त्वचेवर परफ्यूम लावा

कोरड्या त्वचेवर परफ्यूम लावल्यास त्याचा सुगंध लगेचच उडून जातो. त्यामुळे परफ्यूम लावण्यापूर्वी त्वचेवर हलका मॉइश्चरायझर लावल्यास परफ्यूम त्वचेशी चांगल्या प्रकारे मिक्स होतो आणि अधिक वेळ टिकतो.

3. परफ्यूम थेट कपड्यांवर स्प्रे करू नका

खूप लोक परफ्यूम थेट कपड्यांवर मारतात, पण हे चुकीचं आहे. यामुळे सुगंध लवकर उडून जातो आणि काही वेळा कपड्यांवर डागही पडू शकतात. परफ्यूम नेहमी त्वचेवरच स्प्रे करा, जेणेकरून तो त्वचेशी मिसळून नैसर्गिकपणे सुगंध देतो.

4. परफ्यूमची बाटली हलवू नका

काही लोक परफ्यूम लावण्यापूर्वी बाटली जोरात हलवतात. पण हे करणे चुकीचे आहे. यामुळे परफ्यूमच्या कंपोजिशनवर परिणाम होतो आणि त्याची गुणवत्ता कमी होते. म्हणून परफ्यूम वापरण्यापूर्वी त्याला हलवू नका.

5. परफ्यूम लावल्यानंतर हात रगडू नका

अनेकांना सवय असते की, परफ्यूम लावल्यानंतर कलाई एकमेकींवर रगडतात. हे टाळा. यामुळे परफ्यूमचे टॉप नोट्स लवकर उडून जातात आणि सुगंध फारसा टिकत नाही.

टीप: परफ्यूममध्ये अल्कोहोल असतो, जो चेहऱ्याच्या नाजूक त्वचेला नुकसान करू शकतो. त्यामुळे परफ्यूम लावताना चेहरा टाळा. याशिवाय, आपल्या त्वचेला शोभेल असा आणि नैसर्गिक गुणधर्म असलेला परफ्यूम निवडणंही महत्त्वाचं आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष
सिंदखेडराजा नगरपरिषदेत 21वर्षीय सौरभ तायडे विजयी, कमी वयाचा नगराध्यक्ष.
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?
मशालीला आईस्क्रीम कोनासारखं फेकलं...भाजपची टीका, राऊतांचं उत्तर काय?.
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ...
कल्याणमध्ये राजकीय भूंकप, भाजप अन् शिंदे सेनेला मोठा हादरा; एकनिष्ठ....
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र
हे विजयी कसे झाले? महायुतीच्या विजयानंतर 'समाना'तून जोरदार टीकास्त्र.
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?
...म्हणून गप्प होतो, पण आता ती वेळ आलीये, नितेश राणेंचा रोख कुणाकडे?.
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना
जागा वाटपाची रस्सीखेच फार ताणू नका... राज ठाकरे यांच्याकडून सूचना.
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय
काय तो विजय, सगळं OK... शहाजी बापूंची खास डायलॉगबाजी, खेचून आणला विजय.
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का
राणे बंधूंच्या लढाईत निलेश राणेंची सरशी; मालवण, कणकवलीत भाजपला धक्का.
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद
उपऱ्यांचा प्रवेश, नाराज निष्ठावंत BJP समर्थकांचं आंदोलन, भाजपमध्ये वाद.
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल
सून जिंकली, सासू रुसली! राजकीय घराणं अन् नेत्यांच्या गणगोताचा निकाल.