Weight Loss | वजन कमी करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ महत्त्वाचा! जाणून घ्या ‘4’ महत्त्वपूर्ण फायदे

आपल्या सर्वांना माहित आहे की सकाळचा नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट (Breakfast) आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. त्यात बरेच पौष्टिक घटक उपस्थित असतात. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेणे टाळतात.

Weight Loss | वजन कमी करण्यासाठी ‘ब्रेकफास्ट’ महत्त्वाचा! जाणून घ्या ‘4’ महत्त्वपूर्ण फायदे
सकाळचा नाश्ता
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 12:15 PM

मुंबई : आपल्या सर्वांना माहित आहे की सकाळचा नाश्ता अर्थात ब्रेकफास्ट (Breakfast) आरोग्यासाठी खूप महत्वाचा असतो. त्यात बरेच पौष्टिक घटक उपस्थित असतात. बरेच लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळीची न्याहारी घेणे टाळतात. याशिवाय सकाळच्या नाश्त्यात केवळ कॉफी किंवा चहा पितात. मात्र, असे करणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते (Weight loss tips eat breakfast to lose weight know the benefits).

तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की, ब्रेकफास्ट न खाल्ल्याने वजन कमी होण्याऐवजी उलट वजन वाढतं. चला तर जाणून घेऊया की, वजन कमी करण्यासाठी नाश्ता करणे का आवश्यक आहे?

चयापचय वाढतो

जेव्हा आपण सकाळी उठता तेव्हा रात्रभर पोटात काहीच न गेल्यामुळे आपला चयापचय दर कमी होतो. यामुळे आपली फॅट बर्निंग प्रक्रिया गती मंद होते. म्हणूनच सकाळी जागे झाल्यानंतर तासाभरात काहीतरी खाणे महत्वाचे आहे. चयापचय दर वाढवण्यासाठी, दररोज सकाळी न्याहारी करा. या ब्रेकफास्टमध्ये आपण अंडी, ओट्स, उपमा, इडली इत्यादी पौष्टिक पदार्थ घेऊ शकता.

‘नाईट क्रेविंग’ कमी करते

अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पौष्टिक, निरोगी आणि फायबर समृद्ध नाश्ता केल्याने रात्रीची भूक कमी होते. जे लोक सकाळी पुरेसे अन्न खात नाहीत, त्यांना दिवसभर कार्ब खाण्याची तीव्र इच्छा होत असते. न्याहरीत उच्च कार्बोहायड्रेट आहार खाणे आवश्यक आहे, यामुळे साखरेची पातळी संतुलित राखली जाते आणि अन्नाची तलफ देखील कमी होते. तथापि, जे लोक सकाळच्या नाश्त्यात कमी कार्ब खातात, ते संध्याकाळी अधिक कार्ब सेवन करतात (Weight loss tips eat breakfast to lose weight know the benefits).

पोट बराच काळ भरलेले राहते

सकाळी फायबर समृद्ध पदार्थ खाल्ल्याने तुमचे पोट बर्‍याच वेळेस पूर्ण दिवस भरलेले राहते. यामुळे, अरबट-चरबट आणि चटपटीत तेलकट पदार्थ खाणे टाळले जाते. असे पदार्थ खाल्ल्याने तुमचे वजन झपाट्याने वाढू लागते. जेव्हा, आपण आपला सकाळचा नाश्ता वगळता, तेव्हा आपण आपली क्रेविंग वाढवण्याचे काम करता आणि आपली सर्व मेहनत व्यर्थ ठरते.

पर्याप्त प्रमाणात प्रथिने प्रदान करते

सकाळी नाश्ता न खाल्याने आपण प्रथिनांसह इतर आवश्यक पोषक द्रव्ये गमावता. जर आपल्याला दीर्घकाळापर्यंत वजन नियंत्रित किंवा कमी करायचे असेल, तर आहारात पुरेशी प्रथिने सेवें करा. प्रथिने आपल्या रक्त पेशी आणि स्नायूंच्या दुरुस्तीचे कार्य करते. न्याहारी खाल्ल्याने शरीराला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळतात आणि परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Weight loss tips eat breakfast to lose weight know the benefits)

हेही वाचा :

Skin Care | त्वचेसंबंधित समस्यांना दूर ठेवायचंय? मग, ‘या’ फळांचा नक्की वापर करा!

Weight Loss : मनुके आणि गूळ वजन कमी करण्यासाठी जबरदस्त फायदेशीर, वाचा !

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.