Skin Care | त्वचेसंबंधित समस्यांना दूर ठेवायचंय? मग, ‘या’ फळांचा नक्की वापर करा!

आपण आपली त्वचा नितळ बनवण्यासाठी फ्रूट फेस पॅक देखील वापरू शकता. हे त्वचेला चमकदार बनवण्यासाठी आणि मुरुम काढून टाकण्यासाठी मदत करतात. चला तर, जाणून घेऊया कोणते फूट फेस पॅक कोणत्या समस्येवर गुणकारी ठरतील...

1/5
Skin Care 1
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण बीटचा फेसपॅक घरच्या घरी तयार करू शकतो. ताज्या बीटचा रस, दही, बेसन पीठ आणि लिंबाचा रस आवश्यक असेल. फेसपॅक तयार करण्यासाठी हरभरा पीठ, दही, लिंबाचा रस आणि बीटचा रस एकत्र मिसळा आणि चांगली पेस्ट तयार करा. संपूर्ण चेहऱ्याला लावा आणि वीस मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
2/5
केळीमध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यात व्हिटामिन बी 6, व्हिटामिन सी, पोटॅशियम आणि सिलिकासारखे पोषक घटक असतात. ते हायपरपीग्मेंटेशनपासून मुक्तता मिळवण्यासाठी काम करतात.
3/5
आपण सफरचंदाचा देखील फेस मास्क तयार करू शकता. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात. हे अतिनील किरणांमुळे होणार्‍या नुकसानापासून त्वचेच संरक्षण करते. तसेच, त्वचेवरील वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यास देखील मदत करते.
4/5
द्राक्षामध्ये फ्लेव्होनॉइड्स, रेझेवॅटरॉल आणि टॅनिन असतात. हे घटक फ्री रॅडिकल्सशी लढायला मदत करतात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.
5/5
संत्र्याची फळाची साल त्वचेला चमकदार बनवण्यासाठी मह्त्वपूर्ण ठरते. तसेच, डाग, मुरुम आणि टॅनिंग कमी करण्यास देखील मदत करते.