जास्त केस गळण्याची ‘ही’ आहेत 5 सामान्य कारणे, जाणून घ्या
आजकाल केस गळण्याची समस्या सामान्य झाली आहे. कारण बदलती जीवनशैली आणि अनहेल्दी खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे यासर्वांचा परिणाम केसांवर होऊ लागल्या आहे. या सवयींमुळे केसांच्या समस्या वाढतच चालेल्या आहे. तर आजच्या या लेखात आपण अशी 5 पाच कारणे जाणून घेऊयात ज्यामुळे केस गळण्याच्या समस्या अधिक वाढत चालेल्या आहेत.

आजकाल बहुतेक लोकांना केस गळतीची समस्या भेडसावत आहे. चूकीची जीवनशैली आणि अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयींव्यतिरिक्त, केस गळतीची अनेक कारणे आहेत. यामध्ये हार्मोनल असंतुलन, ताणतणाव आणि जास्त केसांची स्टाईलिंग आणि इतर अनेक कारणे समाविष्ट आहेत. जर तुम्ही तुमचे केस नेहमी बन किंवा पोनीमध्ये ठेवले तर जास्त केस गळू लागतात कारण केस जास्त वेळ घट्ट बांधल्याने देखील नुकसान होते. हेल्थलाइनच्या मते, तुम्ही जर कामाचा जास्त ताण घेतल्यास, घट्ट वेण्या बांधल्यास आणि केसांवर विविध कॅमिकलचा वापर केल्याने केस खराब होऊ लागतात.
या लेखात आम्ही तुम्हाला केस पातळ होण्यामागील काही सामान्य कारणे सांगणार आहोत. तसेच, केस पातळ झाल्यावर काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊ. चला तर मग केस का गळतात आणि ते कसे रोखायचे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात.
केस गळतीची/ पातळ होण्याची समस्या वाढत असेल तर ही कारणे असू शकतात
मानसिक ताण हे कारण असू शकते
केस गळण्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. आजच्या काळात प्रत्येकजण छोट्या छोट्या गोष्टींची चिंता करत असतात. त्यामुळे त्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही चांगले राहत नाही जर तुम्ही ताण घेतला तर त्याचा तुमच्या केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यासाठी तुम्ही योगा करण्याची मदत घेऊ शकता आणि निसर्गात थोडा वेळ घालवून तुम्ही तुमचा ताण कमी करा.
पौष्टिक अन्न न खाणे
आजकाल अनेकजण योग्य आहार घेत नाही, ज्यामुळे त्यांचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतोच पण त्यामुळे केस गळू शकतात. जर तुम्ही जास्त जंक फूड खाल्ले तर ते तुमचे केस कमकुवत करू शकते. केस गळणे हे व्हिटॅमिन डी, आयर्न, झिंक सारख्या पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील होऊ शकते. म्हणून, तुम्ही तुमच्या आहारात घरगुती अन्न आणि मोड आलेले धान्य, फळे, सॅलड, हिरव्या पालेभाज्या आणि दही यासारख्या हेल्दी पदार्थांचा समावेश करावा.
हार्मोनल असंतुलन
अनेक महिलांना हार्मोनल असंतुलनाची समस्या असते. याचे कारण अयोग्य आहार आणि ताण असू शकते. त्यामुळे केस गळण्याची समस्या देखील सुरू होते. गर्भधारणेदरम्यान आणि मेनोपोजच्या दरम्यान हार्मोन्स असंतुलित होतात, ज्यामुळे केस गळण्याची समस्या वाढू शकते.
केसांची स्टाईलिंग हे देखील एक कारण आहे
तुम्ही अशा महिलांपैकी एक असाल ज्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करून पहायला आवडतात आणि दररोज केसांवर काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, तर यामुळे तुमचे केस मुळापासून कमकुवत होऊ शकतात आणि केस गळू शकतात. म्हणून, कधीही तुमचे केस घट्ट बांधू नका आणि केसांवर स्ट्रेटनर्स आणि कर्लर्स सारख्या हेअर स्टाइलिंग साधनांचा वापर कमी करा.
वृद्धत्व हे कारण असू शकते
वय वाढत असताना शरीरात अनेक आजार उद्भवू लागतात, त्याचप्रमाणे तुमचे केस देखील कमकुवत आणि पातळ होऊ लागतात कारण तुमचा आहार योग्य राहत नाही, ज्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळत नाही आणि तुम्हाला केस गळतीची समस्या निर्माण होऊ शकते.
(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
