डायबिटीस कशामुळे होतो? डायबिटीस होऊ नये म्हणून आधीच अशी घ्या काळजी

मधुमेह आता एक जागतिक आव्हान बनले आहे. जो फक्त नियंत्रित केला जाऊ शकतो. अलीकडेच एका अभ्यासाच्या मदतीने म्हातारपणात मधुमेहाचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये स्वादुपिंडातील काही अंतःस्रावी पेशींच्या नुकसानाबाबत संशोधन करण्यात आले आहे. जाणून घ्या या अभ्यासात काय आढळून आले.

डायबिटीस कशामुळे होतो? डायबिटीस होऊ नये म्हणून आधीच अशी घ्या काळजी
Follow us
| Updated on: Feb 12, 2024 | 6:44 PM

prevent diabetes : मधुमेह आता एक गंभीर आजार बनला आहे. भारतात मधुमेहाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जगभरात लाखो लोकांना मधुमेह आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार सुमारे ४२.२ कोटी लोकांना मधुमेह आहे. मधुमेह ही एक जागतिक समस्या बनली आहे. मधुमेह झाल्यानंतर त्यावर कोणताही उपचार नाही. टोकियो मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटीच्या काही संशोधकांनी वाढत्या वयामुळे होणाऱ्या मधुमेहाविषयी अभ्यास केला आणि त्यांना असे काहीतरी सापडले, जे वृद्धांमध्ये मधुमेह टाळण्यास मदत करू शकते.

स्वादुपिंड हा इंसुलिन सोडून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे, मधुमेहाचा धोका वाढतो.  या पेशी अंतःस्रावी पेशी आहेत, जे इंसुलिन हार्मोन तयार करतात. वाढत्या वयानुसार, या पेशी नष्ट होऊ लागतात, ज्यामुळे वृद्धत्वात मधुमेह होऊ शकतो.

अभ्यासात वय आणि लिंगाच्या आधारे मधुमेह होण्याचा धोका किती असतो याबाबत निरीक्षण करण्यात आले. यामध्ये असे समोर आले की, या पेशींची हानी महिलांमध्ये अधिक होते. या पेशींचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ज्यामुळे मधुमेह होण्यापासून बचाव होऊ शकतो.

व्यायाम करा

व्यायाम केल्याने शरीर सक्रिय राहते. यामुळे आपली चयापचय क्रिया देखील चांगली राहते. व्यायामामुळे आपल्या पेशींची इन्सुलिन संवेदनशीलता देखील वाढते, ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. वजन कमी करण्यात ही व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. दररोज ३० मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

वजन कमी

जास्त वजन हे मधुमेहाचे एक प्रमुख घटक आहे. तुमचे वजन जास्त असल्यास वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. त्यासाठी आहाराचे नियोजन करू शकता. यामुळे तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

जेवनावर नियंत्रण ठेवा

जेवताना अनेक वेळा आपण एकाच वेळी खूप जेवतो. नंतर बराच वेळ काहीही खात नाही. यामुळे आपल्या रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते. त्यामुळे मधुमेहाचा धोका असतो. एकाच वेळी जास्त खाण्याऐवजी, थोड्या अंतराने थोडे जेवण घ्या.

धूम्रपान करू नका

धूम्रपानामुळे इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्या शरीरातील पेशी इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाहीत आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहात नाही. म्हणून, जर तुम्ही धूम्रपान करत असाल, तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते सोडण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही धूम्रपान करत नसल्यास, निष्क्रिय धूम्रपान देखील टाळण्याचा प्रयत्न करा.

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.